मुंबई : न्यूझीलंडच्या विरोधात क्राइस्टचर्च टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये भारताने २४२ रन केले. कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा फ्ल़ॉप ठरला आहे. तो फक्त 3 रनवर आऊट झाला. न्यूझीलंड दौऱ्यात विराटची बॅट शांत आहे. शनिवारी झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये विराटने १५ बॉलचा सामना केला. पण ३ रनवर त्याला आपली विकेट गमवावी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार विराट कोहलीने एक रिव्यू देखील घेतला. पण त्याचा फायदा झाला नाही. टिम साउदीने कोहलीला एलबीडब्ल्यू केलं. कोहलीची बॅट पुन्हा एकदा रन न करता माघारी परतली. पण विराटला १० वेळा आऊट करण्याचा रेकॉर्ड टिम साउदीने आपल्या नावे केला आहे. सगळ्या फॉरमॅटमध्ये मिळून टीम साऊदी ने हा रेकॉर्ड केला आहे. टेस्टमध्ये तिसऱ्यांदा त्याने विराटला आऊट केलं आहे. या शिवाय टी२० मध्ये सहा वेळा साउदीने कोहलीला आउट केलं आहे.


विराट कोहलीने आतापर्यंत १० इनिंगमध्ये २०.४ च्या रनरेटने २०४ रन केले आहेत. ३१ वर्षात पहिल्यांदा विराटची कामगिरी इतकी खराब ठरली आहे. मागील २१ इनिंगमध्ये त्याने एकही शतक ठोकलं नाही.


कोहलीने शेवटचं शतक बांगलादेशच्या विरोधात ठोकलं होतं. त्याने डे-नाईट सामन्यात त्याने १३६ रन केले होते. न्यूझीलंड दौऱ्यात त्याने ७ इनिंगमध्ये फक्त १८० रन केले आहेत. ज्यामध्ये एक अर्धशतक देखील आहे.


न्यूझीलंडच्या विरुद्ध टेस्टमध्ये विराटने २ इनिंगमध्ये २ आणि १९ रन केले आहेत. दुसऱ्या टेस्टमध्ये १५ बॉलमध्ये ३ रन करत तो आऊट झाला. टिम साउदीने त्याला कोहलीला एलबीडब्ल्यू केलं.