Telangana Hind Kesari : पुण्याच्या अभिजीत कटकेची `हिंद केसरी`च्या फायनलमध्ये धडक
तेलंगणामधील हिंद केसरी (Telangana Hind Kesari 2023) स्पर्धेतील (Abhijeet Katke) फायनलमध्ये कुस्तीपटू अभिजीत कटकेने जागा मिळवली आहे.
Telangana Hind Kesari : तेलंगणामधील हिंद केसरी (Telangana Hind Kesari 2023) स्पर्धेतील (Abhijeet Katke) फायनलमध्ये कुस्तीपटू अभिजीत कटकेने जागा मिळवली आहे. 2017 सालचा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावणाऱ्या अभिजीतने तेलंगणा येथे सुरू असणाऱ्या हिंद केसरीमध्ये धडक मारली असून संध्याकाळी फायनल होणार आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास हरियाणाच्या सोनूवीरसोबत हिंद केसरीच्या फायनलचा थरार रंगणार आहे. (Telangana Hind Kesari 2023 Pune Abhijeet Katke in final latest marathi news)
दोघांच्या लढतीनंतर तेलंगणामध्ये सुरू असलेल्या हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडेस जाते की हरियाणाकडे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. विजय चौधरी स्पर्धेमधून बाहेर पडलेत.
2017 सालचा 'महाराष्ट्र केसरी' अभिजीत कटकेला हिंद केसरी होण्यापासून एक पाऊल दूर आहे. भूगाव मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीतने किरण भगतला पराभूत करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला होता. अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे.
दरम्यान, अखिल भारतीय ॲमॅच्युअर रेसलिंग फेडरेशनतर्फे हिंदकेसरी हा किताब देण्यात येतो. हा किताब या फेडरेशन तर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणाऱ्या विजेत्यास दिल्या जातो. याआधी 2013 साली पुण्याचा अमोल बराटेने हा किताब पटकावला होता.