जोहान्सबर्ग : भारत आणि द. आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्गमध्ये तिसरी कसोटी रंगणार आहे. तिसऱ्या कसोटीआधी आफ्रिकेला मोठा झटका बसलाय.


टेम्बाच्या बोटाला झाली दुखापत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकेचा फलंदाज टेम्बा बावुमाच्या बोटाला दुखापत झाल्याने तो तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीला बुधवारी सुरुवात होणार आहे.


भारताविरुद्धच्या मालिकेत आफ्रिका २-०ने आघाडीवर


द. आफ्रिकेने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलीये. बावुमाच्या बोटाला गेल्या आठवड्यात वनडे टूर्नामेंट खेळताना दुखात झाली होती. या दुखापतीमुळे तीन ते चार आठवडे तो क्रिकेट खेळू शकणार नाही.


भारताविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टमध्ये बावुमा खेळला नव्हता.