...म्हणून सेरेनानं टॉपलेस होऊन गायलं `हे` गाणं
`आय टच मायसेल्फ`
मुंबई: विश्वविख्यात टेनिसपटू सेरेना विल्यम्स नेहमीच तिच्या कृतीतून अनेकांनाच आदर्श देत असते. मग तो टेनिस कोर्ट असो किंवा आपल्या मुलीसाठी तिने लिहिलेली एखादी पोस्ट असो. अशी ही सेरेना सध्या चर्चेत आली आहे ते म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमुळे.
ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांच्या कर्करोगासंबंधीच्या जनजागृती महिन्याच्या निमित्ताने सेरेनाने एक गाणं गायलं असून त्या माध्यमातून तिने अत्यंत महत्त्वाचा असा संदेश दिला आहे.
अतिशय महत्त्वाचा संदेश पोहोचवण्यासाठी तिने टॉपलेस होऊन गाणं गात सर्वांचच लक्ष वेधलं आहे.
'आय टच मायसेल्फ' असे बोल असणाऱ्या या गाण्याची अनेकांनीच प्रशंसा केली असून सेरेनाचंही कौतुक केलं आहे.
स्वत:च्या चौकटीतून बाहेर येत सेरेनानं सर्वच महिलांना वेळोवेळी त्यांनी वैद्यकिय तपासणी करुन घ्यायवी अशी विनंतीही केली आहे.
कॅन्सरचा आजार बळावण्यापूर्वीच त्याचं निदान झाल्यास वेळीच योग्य ते उपचार घेतल्याल अनेक जीव वाचतील असं तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेरेनाचा हा व्हिडिओ चर्चेत असून, तिच्या सोशल मीडिया पोस्टकडेच पुन्हा एकदासर्वांचं लक्ष गेलं आहे.
टेनिस जगतात अव्वल स्थानी असणाऱ्या सेरेना विल्यम्स हिने बऱ्याच गोष्टी आणि समजुती मोडीत काढत अनेकदा काही ठाम भूमिका मांडल्या आहेत. हे त्यातीलच पुढचं पाऊल आहे असंच म्हणावं लागेल.