Tennis Players Fight: फ्रान्समध्ये खेळलेल्या जाणाऱ्या ऑरलियन्स चॅलेंजर स्पर्धेमध्ये (Orleans Challenger Tournament) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेंच टेनिसपटू कॉरेंटिन मॉटेट आणि बल्गेरियाचा टेनिसपटू अँड्रियन एड्रीव हे सामन्यानंतर (Fight On Tennis Court) एकमेकांना भिडले. प्रकरण शिवीगाळ आणि हाणामारीपर्यंत पोहचलं. ही घटना ऑरलियन्स चॅलेंजर स्पर्धेच्या राऊंड ऑफ 16 मध्ये घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑरलियन्स चॅलेंजर स्पर्धा ही फ्रान्समधील प्रसिद्ध स्पर्धा आहे. अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतात. जागतिक क्रमवारीत 247 व्या क्रमांकावर असलेल्या अँड्रियन एड्रीवने 64 व्या स्थानी असलेल्या कॉरेंटिन मॉटेटचा 2-6, 7-3 आणि 7-6 ने पराभव केला (Corentin Moutet vs Adrian Andreev). त्यानंतर सामना संपल्यावर हस्तांदोलन करताना दोन्ही खेळाडू भिडले. त्यावेळी मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं.


नेमकं काय झालं?


अँड्रियन एड्रीवला पहिल्या सेटमध्ये 3-0 ने माघार घ्यावी लागली. त्यानंतर त्याने 6-2ने सेट देखील गमावला. दुसऱ्या सेटमध्ये अँड्रियन एड्रीवने (Adrian Andreev) 7-3 ने सेट आपल्या नावावर केला. त्यामुळे आता बरोबरीत खेळणाऱ्या दोघांसाठी पुढचा सेट महत्त्वाचा होता. 


तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी ताकद लावली. मात्र, अखेर अँड्रियन एड्रीव कॉरेंटिन मॉटेटवर भारी राहिला. तिसऱ्या सेटमध्ये कॉरेंटिन मॉटेटला (Corentin Moutet) पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सामन्यामध्ये अँड्रियन एड्रीवला विजय झाला. सामना संपल्यानंतर प्रथेप्रमाणे दोन्ही खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. त्यावेळी राडा झाला.


पाहा व्हिडीओ-



दरम्यान, दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. अखेर पंचांनी खुर्चीवरून खाली उतरून दोघांना बाजूला केलं. एकीकडे रॉजर फेडरर निवृत्त झाल्यावर नडाल रडताना दिसला. तर दुसरीकडे एड्रीव आणि मॉटेट यांच्यात राडा झाला. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे (Video Gone Viral). 


Mankading: हर्षा भोगलेच्या ट्विटवर बेन स्टोक्स भडकला, वाचा काय आहे प्रकरण