Mankading: हर्षा भोगलेच्या ट्विटवर बेन स्टोक्स भडकला, वाचा काय आहे प्रकरण

Mankading Ranout: बेन स्टोक्सचे 4 स्फोट्क ट्विट

Updated: Oct 1, 2022, 06:26 PM IST
Mankading: हर्षा भोगलेच्या ट्विटवर बेन स्टोक्स भडकला, वाचा काय आहे प्रकरण title=

Ben Stokes-Harsha Bhogle: भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेच संघादरम्यान खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दिप्ती शर्माने (Deepti Sharma) केलेल्या मँकाडिंग रनआऊटची (Mankading Ranout) सध्या तुफान चर्चा होताना दिसत आहे. इंग्लंडच्या चार्ली डीनला दिप्तीने रनआऊट केलं होतं. त्यानंतर आता क्रिडाविश्वास एकच चर्चा सुरू आहे. मँकाडिंग बरोबर की चूक असा सवाल पुन्हा विचारला जातोय.

दिप्तीच्या मँकाडिंग रनआऊटवर भारतीय समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी 8 मोठे ट्विट करत दिप्तीची पाठराखण केली होती. ट्विट करताना हर्षा भोगले यांनी इंग्लंडच्या विचारसरणीचा आणि संगोपनाचा उल्लेख केला होता. त्यामुळे आता इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन बेन स्टोक्स (Ben Stokes) चांगलाच भडकला आहे.

Ben Stokes काय म्हणाला?

हर्षा मँकाडिंगवर लोकांच्या मतांवर संस्कृती आणता, हे योग्य आहे का?, असा सवाल बेन स्टोक्सने विचारला आहे. 2019 साली वर्ल्ड कपची (World Cup) फायनल झाली होती. आजही मला सतत भारतीय फॅन्सचे कॉल आणि मॅसेज येतात, त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय का?, असा सवाल देखील बेन स्टोक्सने हर्ष भोगले यांना विचारला.

ही संस्कृती आहे का? अजिबात नाही... मला फक्त इंग्लंडच्याच नाही तर जगभरातील लोकांकडून मॅसेज येतात. जगभरातील लोकांनी मँकाडिंगवर टीका केली आहे, असंही स्टोक्स म्हणाला आहे. या विशिष्ट घटनेवर उर्वरित जगाच्या प्रतिक्रिया काय आहेत? इंग्लंड (England Cricket Board) हा एकमेव क्रिकेट खेळणारा देश नाही, ज्याने या निर्णयावर आवाज उठवला आहे, असंही स्टोक्स म्हणालाय.

T20 World Cup: टीम इंडियाचा 'दुसरा झहीर खान' कोण?, पाकिस्तानचा कामरान म्हणतो...

 

Harsha Bhogle काय म्हणाले होते?

मला हे खूप त्रासदायक वाटतं की, इंग्लंडमधील मीडियाचा एक वर्ग गेमच्या नियमांनुसार खेळलेल्या मुलीला प्रश्न विचारत आहेत. अनेकजण दिप्तीची कशी चूक आहे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत हर्षा भोगले यांनी टीका केली होती. त्यावर आता बेन स्टोक्सने प्रत्युत्तर दिलंय.