मुंबई : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza Retirement) निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. माझ्या टेनिस कारकिर्दीतील 2022 चा अखेरचा मोसम असेल असं सानिया नमूद केलं. ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open 2022) खेळायला गेलेल्या सानियाने हा अखेरचा मोसम असल्याचं सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, सानियाने बुधवारी ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या राऊंडमध्ये पराभव झाल्यानंतर निवृत्तीबाबत घोषणा केली. (tennis star and cricketer shoaib malik wife sania mirza announces her retirement)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानिया काय म्हणाली? 


2022 माझा अखेरचा मोसम असेल. मी दर आठवड्यात भविष्यातील तयारी करतेय, पण हे नक्की नाही की मी पुढचा संपूर्ण सीजन खेळेन की नाही. मी आणखी चांगली खेळू शकते, पण आता शरीर साथ देत नाहीये. ही बाब माझ्यासाठी सर्वात खेदजनक आहे. 


आतापर्यंत भारताच्या 2 महिला टेनिसपटूंनी डबल्यूटीएचं विजेतेपद पटाकावलं आहे. त्यामध्या सानियाचा समावेश आहे. सानिया सिंगल्समध्ये 100 मध्ये पोहचणारी एकमेव भारतीय आहे. मात्र सानियाला दुर्देवाने पाठीच्या दुखापतीमुळे महिला एकेरीतून माघार घ्यावी लागली.  


सानिया निवृत्तीबाबत काय म्हणाली?  


"मी दररोज या अडचणीतून बाहेर येण्यासाठी एखाद्या प्रेरणेचा मार्ग शोधतेय. आता आधीसारख ताकद नाही. मी नेहमी म्हणते की जोपर्यंत मला मजा येत आहे तोपर्यंत मी खेळत राहीन, पण जे घडत आहे ते पाहून मला वाटत नाही की मी त्याचा आनंद घेत आहे", असं सानियाने स्पष्ट केलं. 


"मी नव्या दमाने कमबॅक करण्यासाठी कठोर मेहनत घेतली. वजन कमी केलं. एक आई म्हणून आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी नुकत्याच आई झालेल्या प्रमाणे ती स्वप्नं शक्य तितकी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. या मोसमानंतर शरीर मला साथ देईल असे वाटत नाही", असं सानिया म्हणाली.