Sania Mirza Emotional Post : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हे आता विभक्त झाले आहेत. दोघांनी आपलं 12 वर्षांचं नातं तोडलं अन् शोएबने आपला वेगळा संसार थाटला आहे. शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर दोघांनीही माध्यमांशी संवाद साधण्याचं टाळलं. मात्र, सानिया मिर्झा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसून येतं. नुकतंच तिने ग्रँड स्लॅम विजेता रोहन बोपन्ना यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते. अशातच आता इन्टाग्रामवर (Sania Mirza Instagram ) सानियाने एक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे सानियाची पोस्ट?


जेव्हा तुम्ही आठ वर्षांचे असता तेव्हा तुम्हाला डुलकी लागते. मात्र, जेव्हा जाग येते तेव्हा एका झटक्यात तुम्ही मोठे झाले असता. 28 वर्षांचे झाल्यानंतर तुम्ही थेट पालक होता. तुम्ही आई झाला की, फक्त तुम्हीच नाहीतर तुमचा मुलगा देखील तुमच्यासोबत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला 10 वेळा गाणं गावं लागतं. घट्ट मिठी मारता तेव्हा तुम्हालाही मिठी मारून बसावं वाटतं. जेव्हा मूल वाढत असतं तेव्हा तुमच्या मनावर देखील दडपण येतं. मात्र, तुमचा आनंद तेव्हा शब्दात व्यक्त करता येत नाही, अशा भावना सानिया मिर्झाने व्यक्त केल्या आहेत.


रोहन बोपन्नाच्या पार्टीत सानिया मिर्झाने हजेरी लावली होती. त्यातील फोटो शेअर केल्यानंतर सानिया पुन्हा सोशल मीडियावर अॅक्टिव झाली आहे. काही दिवसांपूर्वी 'लग्न असो किंवा घटस्फोट दोन्ही कठीणच असतं. त्यामुळे तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. जाड राहणं कठीण आहे आणि फिट राहणंही कठीण, तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा, अशी पोस्ट सानिया मिर्झाने केली होती. 



दरम्यान, सानिया मिर्झाच्या बहिणीने तिला तिच्या दु:खाच्या काळात मोलाची साथ दिली होती. सध्या सानियाच्या आयुष्यातील प्रचंड नाजूक काळ सुरु आहे. म्हणून चाहत्यांना विनंती आहे की, सानियाच्या गोपनीयतेचा आदर करावा. शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, अशी विनंती देखील सानिया मिर्झाच्या बहिणीने केली आहे. 


सानिया मिर्झाची संपत्ती किती?


सानिया मिर्झाची एकूण संपत्ती सुमारे 200 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. टेनिस स्पर्धा तसेच जाहिरातीच्या माध्यमातून देखील सानियाने बक्कळ पैसा कमवलाय. दर वर्षी सानियाला 3 कोटी रुपये मिळतात. त्याचबरोबर दुबईत तिचं आलिशान घर देखील आहे. तिचं वार्षिक उत्पन्न 25 कोटी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.