मुंबई : क्रिकेट हा जगभरातला सर्वाधिक पाहिला जाणार खेळ आहे. या खेळासोबतच क्रिकेटर्सनाही तितकच महत्व आहे. कारण इतर खेळातील खेळाडूंच्या तुलनेत सर्वांधिक मानधन हे क्रिकेटर्सना मिळत असते. या संदर्भातीलचं एक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंची यादी समोर आली आहे. नेमके या यादीत कोण-कोण आहेत ते पाहूयात..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स हा देशातील सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू आहे. एका अहवालानुसार, कमिन्सची वार्षिक कमाई 2 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर असलयाची माहिती आहे.


सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 29 वर्षीय कमिन्सला देशासाठी खेळण्यासाठी 1.8 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स मिळाले आहेत. त्याला संघाचे नेतृत्व करण्यासाठी 2,00,000 ऑस्ट्रेलियन डॉलर मिळालेत. तर कमिन्स हा सलग तिसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू ठरलाय. 


वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड 1.6 दशलक्ष डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर त्यापाठोपाठ सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 1.5 दशलक्ष डॉलर, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क 1.4 दशलक्ष डॉलर, फलंदाज स्टीव्ह स्मिथ 1.3 दशलक्ष डॉलर अशी क्रमवारी आहे.  


हेझलवूडला मोठा फायदा 
वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड या वर्षी कमाईच्या बाबतीत सर्वात जास्त फायदा झाला. तो पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. हेजलवूड 1.6 दशलक्ष डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.  


दरम्यान ही फक्त ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कमाई होती. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधार पॅट कमिन्स सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू ठरलाय.