मुंबई - क्रीडा क्षेत्रात परदेशी कोच लाभला की खेळाडू चांगली कामगिरी करतात असा एक समज आपल्याकडे आहे. मात्र क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांचे कोच दिनेश लाड (Dinesh Lad) यांनी हा समज मोडीत काढला आहे. कारण दिनेश लाड यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आता परदेशी खेळाडू खास मुंबईत येत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर मखाया एंटिनी (Makhaya Ntini) याचा मुलगा थांडो एंटिनी (Thando Ntini) याने क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी खास बोरिवली गाठली आहे. दिनेश लाड याचं प्रशिक्षण लाभावे यासाठी थाडोने गेले काही दिवस मुंबईत मुक्कामसाठी आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थांडोने आंतरराष्ट्रीय खेळाडू बनेल
थांडोने हा ऑल राऊंडर आहे. तो डावखुरा बॅट्समन असून उजव्या हाताने फास्ट बॉलिंग करतो. जर त्याने एकाग्र होऊन प्रॅक्टिस केली तर तो आगामी एक-दोन वर्षात नक्कीच दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय टीमकडून खेळेल असा विश्वास कोच दिनेश लाड यांनी व्यक्त केला आहे. 2018 मध्ये थांडोने 19 वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. 


थांडोला भारतात सराव करणे फायदेशीर वाटते 
भारतात येऊन क्रिकेटचा सराव करण्याचा निर्णय योग्य घेतला असे थांडोला वाटू लागले आहे. "दिनेश लाड यांच्याकडे येऊन क्रिकेटचे धडे गिरवण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरला आहे. पूर्वी मला ड्राईव्ह फटके मारताना येणाऱ्या अडचणी येत होत्या पण लाड यांचे प्रशिक्षण लाभल्याने दूर झाल्या आहेत. लाड सरांमुळे माझ्या खेळात आमूलाग्र बदल झाला असा विश्वास थांडोने व्यक्त केला."



थांडोनेने दिनेश लाड यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय का घेतला ?
माजी दिग्गज क्रिकेटर्सच्या रोड सेफ्टी वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सीरीजमध्ये सहाय्यक फिजिओ चंद्रास मंचेकर होते. त्या स्पर्धेत मंचकेर यांच्या संपर्कात मखाया एंटिनी आला. यादरम्यान मखाया एंटिनी यांनी मंचेकर यांना आपल्या मुलासाठी चांगला क्रिकेट प्रशिक्षक पाहात असल्याची कल्पना दिली होती. यावेळी मंचेकर यांनी माखया अँटनी याला रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांचे नाव सुचवले. यानंतर थांडो दक्षिण आफ्रिकेतून थेट मुंबईत दाखल झाला.


परदेशी क्रिकेटपटूंचा दिनेश लाड यांच्याकडे प्रॅक्टिससाठी ओढा
थांडोने याने क्रिकेटच्या सरावासाठी मुंबईचा रस्ता पकडल्यानंतर आता इतरही काही परदेशी खेळाडू लाड यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सूक आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत ऑल राऊंडर एंड्रयू साइमंड्स (Andrew Symonds) आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कार्ल हूपर (Carl Hooper) यांची मुले दिनेश लाड यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी येणार असल्याची माहिती दिनेश लाड यांनी दिली आहे. 


मेघा कुचिक, झी न्युज