मुंबई : IPL 2022च्या मेगा ऑक्शनमध्ये झालेली एक खूप मोठी चूक समोर आली आहे. यामध्ये ऑक्शनर चारू शर्मा यांच्याकडून ही चूक झालीये. तर या चुकीचा फटका काही प्रमाणात मुंबई इंडियन्सला बसला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी केलेला खेळाडू दिल्ली कॅपिटल्स टीमला मिळाला. दरम्यान या चुकीचा व्हिडीयो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय.


नेमकी कशी झाली चूक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमदला खरेदी करण्यासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये चढाओढ सुरु होती. मुंबई इंडियन्सने त्याच्यावर 5.25 कोटींची बोली लावली होती. यानंतर चारू शर्मा यांनी दिल्लीला विचारलं की 5.50 कोटींची बोली लावू इच्छितात का? यावेळी दिल्लीच्या किरण कुमार यांनी बोली लावण्यासाठी पॅडल उचचलं मात्र तातडीने त्यांनी ते खाली केलं.



दरम्यान यावेळी चारू शर्मा विसरून गेले खलीलवर मुंबई इंडियन्सने कितीची बोली लगावली होती. त्यानंतर शर्मा, दिल्लीने खलीलवर 5.25 कोटींची बोली लावली असंही म्हणाले.


या सर्व प्रकारानंतर चारू शर्मा यांनी मुंबईला विचारलं की, ते खलीलवर 5.50 कोटींची बोली लावणार आहेत का. यावर मुंबई इंडियन्सने नकार दिला आणि खलील अहमद 5.25 कोटींमध्ये दिल्लीत सामील झाला. जेव्हा की, मुंबई इंडियन्स त्यावर बोली लावली होती.