मुंबई : भारतीय क्रिकेट टीममध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण टॉपचा खेळाडू बनावं. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मात्र अवघ्या 5-6 वर्षांत हे स्वप्न पूर्ण केलं. धोनीने 23 डिसेंबर 2004 रोजी बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. मात्र धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उतरताच अनेक विकेटकीपरची कारकीर्द संपुष्टात आली आणि कर्णधारपद मिळवल्यानंतर कोणत्याही विकेटकीपरना धोनीची जागा घेण्याची संधी नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान धोनीमुळे करिय़र संपष्टात आल्याचा दावा माजी यष्टीरक्षकाने केला आहे. टीम इंडियाचा माजी विकेटकीपर आणि फलंदाज पार्थिव पटेलने खुलासा केला आहे की, धोनीच्या येण्याने टीम इंडियामध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही. पार्थिव पटेलने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी खेळली होती.


धोनीच्या येण्यानंतर पार्थिव पटेलला फारच कमी संधी मिळू लागली. पार्थिव पटेल टीम इंडियाकडून केवळ 25 कसोटी सामने, 38 एकदिवसीय आणि दोन टी -20 सामने खेळलेत. कर्टली एंड करिश्मा शोमध्ये बोलताना पार्थिव पटेल म्हणाला की, मला दिलेल्या संधीचा फायदा उठवता न आल्यामुळे संघातून वगळण्यात आलं.


पटेल पुढे म्हणाला, "खरं सांगायचं तर मला असं वाटत नाही की मी अनलकी होतो. धोनी येण्यापूर्वी मला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनुसार माझी कामगिरी चांगली नसल्याने मला संघातून वगळण्यात आलं. यानंतर धोनी संघात आला.


'मला जास्त खेळायची संधी मिळाली नाही म्हणून मी स्वत:ला अनलकी म्हणू शकत नाही. टीममधून वगळण्यापूर्वी मी 19 कसोटी सामने खेळलो होतो. मी असंही म्हणू शकत नाही मला पुरेश्या संधी मिळाल्या नाहीत. कारण 19 कसोटी सामने पुरेसे आहेत, असंही पार्थिवने म्हटलंय.