Cheteshwar Pujara: चेतेश्वर पुजाऱ्याच्या परतीचे दरवाजे बंद, आता विदेशातील टीममधूनही झाला बाहेर
चेतेश्वर पुजाऱ्याने टीम इंडियाकडून शेवटचा सामना हा जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या या फायनल सामन्यात पुजारा 41 धावा करू शकला होता.
भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराला मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. चेतेश्वर पुजाऱ्याने टीम इंडियाकडून शेवटचा सामना हा जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या या फायनल सामन्यात पुजारा 41 धावा करू शकला होता. यानंतर त्याला टेस्ट टीममधून ड्रॉप करण्यात आले.
पुजारा काऊंटी क्रिकेटमधूनही झाला ड्रॉप :
टीम इंडियातून ड्रॉप झालेल्या चेतेश्वर पुजारासाठी आता अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. पुजारा पुढील वर्षी होणाऱ्या काऊंटी चॅम्पियनशिप 2025 साठी ससेक्स टीममध्ये खेळणार नाही. इंग्लंडच्या क्लबने ऑस्ट्रेलियाच्या डेनियल ह्यूजला आपल्या सोबत ठेवण्यासाठी चेतेश्वर पुजाराला कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. डाव्या हाताचा फलंदाज ह्यूज हा पुढील सीजनमध्ये सर्व चॅम्पियनशिप आणि टी 20 सामन्यांसाठी उपलब्ध असेल.
हेही वाचा : इमाने खलीफच्या सपोर्टमध्ये उतरली अभिनेत्री तापसी पन्नू, म्हणाली 'उसेन बोल्ट आणि मायकल फेल्प्सला पण बॅन करा'
क्लबने ही सुद्धा घोषणा केली की वेस्टइंडीजचा उजव्या हाताचा गोलंदाज जेडन सील्स या काऊंटी टीमकडून चॅम्पियनशिपच्या सुरुवाती सामन्यात खेळेल. पुजारा 2024 मध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा ससेक्स टीमकडून खेळत होते. त्याने ह्यूज टीमच्या पुनरागमनापूर्वी 7 चॅम्पियनशिप सामने खेळले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर 2022 ते 2024 दरम्यान 74.80 च्या सरासरीने 34 सामन्यात 2244 इतक्या धावा केल्या. ज्यात त्याची 10 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. सक्सेसचे मुख्य कोच पॉल फारब्रेसने एका अधिकृत वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले, "चेतेश्वर पुजाराचा करार संपवणे सोपे नव्हते, परंतु डॅनिअल हा टीमच्या गरजेत फिट बसत होता. तसेच आम्हाला आनंद आहे की तो पुढील संपूर्ण सीजन आमच्या सोबत असेल".
चेतेश्वर पुजाराची कारकीर्द :
चेतेश्वर पुजाराचे टेस्ट करिअर उत्तम ठरले. पुजाऱ्याने आतापर्यंत 107 टेस्ट सामन्यात एकूण 7195 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 19 शतक आणि 35 अर्धशतक निघाली. पुजारा भारताकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे चौथे खेळाडू आहेत. चेतेश्वर पुजाराने 271 सामन्यांमध्ये 20899 धाव केल्या आहेत. पुजाऱ्याने या दरम्यान 65 शतक आणि 80 अर्धशतक लगावली आहेत.