Johnny Mullagh Medal : तब्बल 5 आठवड्याच्या मोठ्या ब्रेकनंतर टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी मार्गस्त होईल. तर भारत नोव्हेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत परदेशात 11 कसोटी सामने खेळणार आहे. अशातच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट मालिकेची सर्वजण वाट पाहतायेत. ही मालिका भारतासाठी देखील खास असेल. अशातच आता बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात मानाचं 'मुलाघ मेडल' कोण जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.
विराट कोहलीने परदेशी मैदानावर खासकरून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 10 कसोटी सामन्यांमध्ये प्रत्येकी 5-6 शतकं झळकावली आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौरा विराट कोहलीसाठी कमबॅक मालिका असेल का? असा सवाल विचारला जात आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी देखील विराटचं कौतूक केलंय. विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असं मॅथ्यू हेडन म्हणाला आहे. त्यामुळे यंदाचं मुल्लाघ मेडल विराट कोहली जिंकणार का? असा सवाल विचारला जात आहे.
बॉक्सिंग डे कसोटीतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला मुल्लाघ पदक दिलं जाईल, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करून सांगितलं आहे. मुल्लाघ पदकचं नाव 1868 क्रिकेट संघाचे कर्णधार जॉनी मुल्लाघ यांच्या नावावर आहे, जो आंतरराष्ट्रीय दौरा करणारा पहिला ऑस्ट्रेलियन क्रीडा संघ बनला होता. पहिल्यांदाच हे पदक ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडने जिंकलं होतं. 2022 मधील बॉक्सिंग डे सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नरला जॉनी मुलाघ पदक देण्यात आलं होतं. हे विशेष पदक देण्याची सुरुवात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याने झाली.
रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान (WK), ऋषभ पंत (WK), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.
पहिला कसोटी सामना : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दूसरा कसोटी सामना : 6-10 डिसेंबर, एडिलेड (डे-नाइट)
तीसरा कसोटी सामना : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथा कसोटी सामना : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवा कसोटी सामना : 3-7 जानेवारी, सिडनी