IPL 2022 चे `हिरो` दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरिजमध्ये ठरले खरे व्हिलन
IPL मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी बुडवली टीम इंडियाची नाव, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा पराभव
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी 20 सीरिजमध्ये टीम इंडियाने 2 सामने गमावले आहेत. या दोन सामन्यात जे जे खेळाडू फ्लॉप ठरले ते खेळाडू आयपीएलमध्ये सर्वात सुपरहिट ठरले होते. मात्र पहिल्या दोन सामन्यात या खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात यश आलं नाही.
युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल हे दोन्ही स्पिनर्स फ्लॉप ठरले. ऋषभ पंत या दोन्ही खेळाडूंवर नाराज आहे. युजवेंद्रने 4 ओव्हर टाकून 1 विकेट काढली तर 49 धावा दिल्या. अक्षर पटेलनेही 15 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. आयपीएलमध्ये युजवेंद्रने 27 विकेट्स घेतल्या होत्या. सर्वात जास्त विकेट्स घेणारा खेळाडू आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला केवळ एकच विकेट मिळाली.
अक्षर पटेलने दोन सामन्यात 5 ओव्हरमध्ये 59 धावा दिल्या. आयपीएलमध्ये त्याने दिल्लीकडून खेळताना 13 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर 182 धावा केल्या.
हर्षल पटेलनेही आयपीएल 2022 मध्ये उत्तम कामगिरी केली. 15 सामन्यात त्याने 19 विकेट्स घेतल्या होत्या. डेथ ओव्हरमध्ये त्याने फलंदाजांना घाम फोडला होता. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला विशेष कामगिरी करता आली नाही.