क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब सिक्स `या` खेळाडूने मारलाय
जवळपास 100 वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब सिक्स मारण्याचा विक्रम झाला होता. मात्र आजपर्यंत हा विक्रम कोणीही मोडला नाहीये.
मुंबई : टी-20 क्रिकेट म्हटलं की त्यामध्ये सिक्स आणि चौकारांचा पाऊसच पहायला मिळतो. मात्र तुम्हाला माहितीये का क्रिकेटमधील सर्वात लांब सिक्स कोणी मारली आहे. लांब सिक्स मारण्याचा हा विक्रम ना शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे ना महेंद्रसिंग धोनी नावावर. जवळपास 100 वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब सिक्स मारण्याचा विक्रम झाला होता. मात्र आजपर्यंत हा विक्रम कोणीही मोडला नाहीये.
अल्बर्ट ट्रॉट असं या खेळाडूचं नाव आहे. या खेळाडूने 19व्या शतकात क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लांब सिक्स मारली होती. अल्बर्ट ट्रॉट इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी क्रिकेट खेळला.
अल्बर्टने मारलेल्या या सिक्सची लांबी 164 मीटर होती. क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात लांब सिक्स होती. अल्बर्टने हा शॉट ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमधील मेरीलेबर्न क्रिकेट क्लबकडून खेळताना केला होता.
19व्या शतकातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक अल्बर्ट ट्रॉट होते. ते इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी क्रिकेट खेळलेत. इतिहासातील सर्वात लांब 'सिक्स' अल्बर्टच्या नावावर आहे. या खेळाडूने 1910 मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती आहे.
सर्वाधिक लांब सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दोन भारतीयांचाही समावेश आहे. युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे. युवराज सिंगने 119 मीटर लांब सिक्स मारला आहे. तर युवराजच्या नावावर टी-20 मध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे.
एमएस धोनीने 112 मीटरची सिक्स मारली आहे. 2007 टी-20 वर्ल्डकपमध्ये, भारताच्या युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 70 धावांच्या खेळीत ब्रेट लीच्या चेंडूवर 119 मीटर लांब सिक्स मारला होती.