दुबई : T-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. या वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत होणार आहे. प्रत्येकाच्या नजरा या हाय व्होल्टेज सामन्याकडे लागलेल्या आहेत. सुपर-12 स्टेजमध्ये पाकिस्तान आणि भारत या दोघांसाठी हा पहिला सामना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपांत्य फेरीत पोहोचण्यापूर्वी टीम इंडियाला सुपर-12 स्टेजमध्ये एकूण पाच सामने खेळावे लागणार आहेत. सध्याच्या घडीला सर्व टीम्सची निवड करण्यात आली आहे. पाकिस्ताननंतर टीम इंडियाला स्कॉटलंड आणि नामीबियाशीही लढत करावी लागणार आहे.


सुपर -12 मधील टीम इंडियाचे सर्व सामने


  • 24 ऑक्टोबर- भारत विरूद्ध पाकिस्तान

  • 31 ऑक्टोबर- भारत विरूद्ध न्यूजीलंड

  • 3 नोव्हेंबर- भारत विरूद्ध अफगानिस्तान

  • 5 नोव्हेंबर- भारत विरूद्ध स्कॉटलंड

  • 8 नोव्हेंबर- भारत विरूद्ध नामीबिया 


नामीबियाने शुक्रवारी रोमहर्षक लढतीत आयर्लंडचा पराभव करून सुपर-12 मध्ये स्थान मिळवलं. नामीबियासाठी ही ऐतिहासिक संधी आहे, अशा स्थितीत आता भारतासारख्या संघासह मोठ्या संघाशी लढण्याची संधी मिळणार आहे.


स्कॉटलंडच्या बाबतीतही असंच घडलंय. स्कॉटलंड टीमने फेरी-1 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आणि सुपर-12 मध्ये स्थान मिळवून मोठी गोष्ट कमावली आहे.


यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला विजेता बनणार असल्याचा दावेदार मानलं जातंय. भारताचे पहिले दोन सामने मोठ्या संघांविरुद्ध आहेत, मात्र उर्वरित तीन सामन्यांवरही लक्ष ठेवावं लागणार आहे. टी-20 सामन्यांमध्ये कोणताही संघ पलटवार करू शकतो.