थर्ड अंपायर झोपले होते का? चुकीच्या निर्णयानंतर फॅन्स संतापले
थर्ड अंपयारचा या निष्काळजीपणाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले.
नवी दिल्ली : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात असून टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान या सामन्यात थर्ड अंपायर्सचा मोठा निष्काळजीपणा दिसून आला आणि याचा फटका टीम इंडियाला बसला. थर्ड अंपयारचा या निष्काळजीपणाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले.
पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर अंपयारने फलंदाज शार्दूल ठाकूरला आऊट करार दिला. मात्र तो 'नो बॉल' होता. दरम्यान अंपायरच्या या निर्णयावरून चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
थर्ड अंपायरचा निष्काळजीपणा
चौथ्या दिवशी भारत खेळत असताना नाईट वॉचमन म्हणून शार्दूल ठाकूर मैदानावर उतरला. ओपनर के. एल राहुल 5 रन्सवर आणि शार्दूल 4 रन्सवर नाबाद होते. शार्दूल मोठी खेळी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र थर्ड अंपायरच्या निष्काळजीपणाचा फटका शार्दूलला मोठा फटका बसला.
मात्र शार्दूल आऊट झाल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये रबाडाचा तो बॉल नो बॉल असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. यानंतर थर्ड अंपायरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.
शार्दुल ठाकूर रबाडाच्या नो बॉलवर बाद झाला का काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. रबाडाचा चेंडू शार्दुल ठाकूरच्या बॅटच्या बाहेरच्या बाजूला लागला आणि तो दुसऱ्या स्लिपमध्ये बाद झाला. शार्दुलनेही याअगोदर सिक्स मारला होता.
शार्दुल बाद झाल्यानंतर एका चाहत्याने ट्विट केले की, "उत्तम अंपायरिंग. शार्दुल ठाकूरची विकेट. तर अजून एका चाहत्याने लिहिलं, 'थर्ड अंपायर कुठे झोपले होते? ठाकूर नो बॉलवर आऊट झाला."