T20 World Cup: `ओ भाई मुझे मारो` म्हणणाऱ्या व्यक्तीने पुन्हा दिली वॉर्निंग...
व्हीडिओ शेअर करताना मोमीनने आता एक वेगळाच इशारा दिला आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. त्याआधीही भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. लोक 24 ऑक्टोबर रोजी टीव्हीसमोर चिकटून राहणार आहेत. त्याआधी, दोन्ही देशातील लोकांनी व्हिडिओ बनवणं आणि ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी समोर आला या खास व्यक्तीचा व्हीडियो
गेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर, एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये स्टेडियमच्या बाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मीडियासमोर पाकिस्तानी क्रिकेटपटूंना खडे बोल सुनावले होते.
दरम्यान या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने 'ओ भाई मुझे मारो' असं म्हटलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की तो अजूनही मीम्समध्ये दिसत आहे. हे सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव मोमीन साकीब आहे. तर आता त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
व्हीडिओ शेअर करताना मोमीनने आता एक वेगळाच इशारा दिला आहे. नव्या व्हीडियोमध्ये मोमीन म्हणतो, "तुम्ही भावनांनी भरलेल्या पाक-भारत सामन्यासाठी तयार आहात का? फक्त दोन सामने आहेत, एक भारत-पाकिस्तान सामना आणि दुसरा आमिर खानचा लगान चित्रपट. ते दिवस जे तुमचे श्वास थांबवतात. तेच या महिन्याच्या 24 मार्च रोजी होणार आहेत. 2019 ची मॅच संपली. माणसाला वेळ कळत नाही, पण पाकिस्तानसाठी हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे."