मुंबई : गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाला चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या संघात समाविष्ट केले आहे. यंदाच्या स्पर्धेत उथप्पा राजस्थानऐवजी चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पुणे वॉरियर्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलेला उथप्पा नव्या मोसमात चेन्नईच्या संघात खेळेल. या फलंदाजाने चेन्नई संघात सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि राजस्थानबरोबर घालवलेला क्षणही आठवला. तो म्हणाला की, "राजस्थान रॉयल्सबरोबर माझे वर्ष खरोखरच आनंदी गेले. या फ्रँचायझी संघात येतांना मला खूप आनंद झाला. आता २०२१ मध्ये चेन्नईबरोबर माझा क्रिकेट प्रवास सुरू करण्यास मी उत्साही आहे."



२०२० च्या लिलावादरम्यान उथप्पाला राजस्थान संघाने विकत घेतले आणि त्याचा संघात समावेश करण्यात आला. या हंगामात तो 12 सामने खेळल्यानंतर केवळ 196 धावा करू शकला. हा तिसरा हंगाम होता जेव्हा त्याने एकही अर्धशतक केले नाही. गतवर्षीच्या आयपीएलमध्ये राजस्थान संघाने 14 सामन्यांत फक्त 12 गुण मिळवले.



राजस्थान रॉयल्सच्या वतीने जेक लूश म्हणाले की, "रॉबीने आपल्या संघात केलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानू इच्छितो."