दुबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी होणारा सामना उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात जी टीम हरेल त्या टीमचा वर्ल्डकपमधील प्रवास जवळपास संपल्यात जमा असेल. कारण हा सामना जिंकणारी टीम उर्वरित तिन्ही सामने जिंकू शकेल, असं मानलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या दोन्ही टीम्सचे उर्वरित सामने अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध होणार आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानची टीम उपांत्य फेरीत जवळपास पोहोचला आहे. सामन्यासाठी विराट कोहलीने टॉस जिंकणं हे टीम इंडियासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. कारण गेल्या सामन्यात विराटला पाकिस्तानविरुद्ध टॉस जिंकता आला नव्हता.


टॉसची भूमिका


T20 वर्ल्डकप 2021मध्ये सुपर-12 फेरीत आतापर्यंत नऊ सामने खेळले गेले आहेत. या नऊ सामन्यांमध्ये टॉस जिंकणारा संघ विजेता ठरला. या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधारांनी नऊपैकी आठ वेळा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


टॉस जिंकणं का महत्त्वपूर्ण?


दुबईच्या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्यांना चेंडू थांबत बॅटवर येतो. तर दुसरीकडे दव पडत असल्यामुळे फलंदाजी करणं अधिक सोप होतं. यावेळी चेंडू सहजरित्या बॅटवर येतो जेणेकरून तो हिट करता येतो. तर स्पिनर्स आणि वेगवाग गोलंदाजांना चेंडूवर ग्रीप बनवणं कठीण होऊन बसतं.


कर्णधार म्हणून विराटचा टॉस रेकॉर्ड


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला अनेकदा टॉसच्या कारणामुळे मॅच गमवावी लागला आहे. विराटने आतापर्यंत 65 टेस्टमध्ये टीमसाठी कर्णधारपर्यंत भूषवलं आहे. ज्यामध्ये 28 सामन्यांत टॉसचा निकाल त्याच्या बाजूने लागला तर 37 सामन्यांत तो टॉस हरला. तर वनडे सामन्यांमध्ये 95 सामन्यांमध्ये 55 वेळा विराट टॉस हरला आहे. 


टी-20 मध्येही हा विक्रम वाईट आहे. विराटने 45 टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केलं असून 28 सामन्यांमध्ये टॉस गमावला आहे. एकूणच, विराटने तिन्ही फॉरमॅटसह 206 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं असून यापैकी 120 सामन्यांमध्ये तो टॉस हरल्याची नोंद आहे.


न्यूझीलंडविरुद्ध त्याला त्याचा रेकॉर्ड थोडा सुधारावा लागेल. कारण टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल हे निश्चित आहे. नाणेफेकीनेच सामन्याचा 50 टक्के निकाल लागणार आहे.


विराटला 2017मध्ये वनडे आणि टी-20मध्ये कर्णधार बनवण्यात आलं होतं. तेव्हापासून टीम इंडियाने अनेक प्रसंगी मोठे सामने केवळ टॉसमुळे गमावले आहेत. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकली होती. पण त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो संघासाठी वाईट निर्णय ठरला होता.