T20 World Cup: भारतीय टीमच्या `या` खेळाडूवर सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याची मदार!
ICC T20 वर्ल्डकप 2021 मध्ये टीम इंडियाचा सामना शुक्रवारी स्कॉटलंडशी होणार आहे.
मुंबई : ICC T20 वर्ल्डकप 2021 मध्ये टीम इंडियाचा सामना शुक्रवारी स्कॉटलंडशी होणार आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणारा हा सामना विराट सेनेसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण यातून उपांत्य फेरीचा मार्ग निश्चित होण्याची शक्यता आहे.
उपांत्य फेरी गाठण्याची अपेक्षा
अफगाणिस्तानला सुपर 12 टप्प्यात पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची आशा व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, आम्हाला पात्र ठरण्याची आशा आहे.
'जसं हवं होतं तसंच झालं'
रविचंद्रन अश्विन पुढे म्हणाला की, अफगाणिस्तानविरुद्ध तो गोलंदाजी करण्याचा विचार करत होता तसेच बॉल टाकू शकलो. अश्विनने 14 रन्स देत 2 विकेट्स घेतले. ज्यामुळे अफगाणिस्तान संघाने 66 धावांनी सामना जिंकला.
आर अश्विन म्हणाला, "वर्ल्डकपमध्ये जाऊन संघासाठी चांगली कामगिरी करण्याचं माझं स्वप्न होतं. दुर्दैवाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर माझ्यासह संघाला वाईट वाटलं. पण अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आम्हाला पात्र होण्याच्या काहीशी संधी आहेत. सामन्यातील माझ्या कामगिरीने मी खूश आहे. कारण मी जे विचार करू शकतो ते केलं आहे."
सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवून देणार का अश्विन
रविचंद्रन अश्विनचे भारतीय टी-20 संघात दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झालं आहे. त्यामुळे स्कॉटलंडविरुद्ध त्याला संधी मिळेल, असं मानलं जात आहे. भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवून देण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. ज्यामुळे उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होईल.