मुंबई : आयपीएलच्या ११व्या सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये कोणते ४ संघ असणार हे चित्र स्पष्ट झालेय. चेन्नई वि पंजाबच्या सामन्यातील विजयी संघासोबत कोणते चार संघ प्ले ऑफमध्ये असणार हे समोर आलेय. हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि राजस्थान हे चार संघ प्ले ऑफमध्ये खेळणार आहेत. पहिल्या स्थानावर हैदराबाद, दुसऱ्या स्थानावर चेन्नई, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे कोलकाता आणि राजस्थान आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलच्या लीग सामन्यांमध्ये दुसऱे स्थान मिळवलेय. आयपीएलमध्ये गेल्या १० हंगामांचा विचार केला असता दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या संघाने सर्वाधिक वेळा आयपीएलचा खिताब जिंकलाय. दुसरीकडे चौथ्या स्थानावर राहिलेल्या संघाला केवळ एकच वेळा खिताब जिंकता आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिलेला संघ पाचवेळा आयपीएलचा विजेता बनलाय. २०११पासून ही सुरुवात झाली. २०१५ पर्यंत हे कायम होते.


हंगाम 2011: चेन्नई 


हंगाम 2012: कोलकाता 


हंगाम 2013: मुंबई 


हंगाम 2014: कोलकाता 


हंगाम 2015: मुंबई 


लीगमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या संघाने दोन वेळा जेतेपद मिळवलेय 


हंगाम 2008: राजस्थान 


हंगाम 2017: मुंबई 


लीगमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाने दोनवेळा जेतेपद मिळवलेय. 


हंगाम 2010: चेन्नई 


हंगाम 2016: सनराइजर्स 


लीगमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या संघाने जेतेपद मिळवलेय


हंगाम 2009: डेक्कन