T20 World Cup 2022: कालच्या दिवशी टीम इंडियाचं (Team India) वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. इंग्लंडविरूद्ध (England) झालेल्या सेमीफायनलच्या (Semifinal) सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. इंग्लंडने भारतावर 10 विकेट्सने मात करत भारताला वर्ल्ड कपबाहेर फेकलं. टीम इंडियाच्या या पराभवानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. दरम्यान टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये जर या तीन खेळाडूंचा समावेश केला असता, तर निकाल वेगळा असण्याची शक्यता होती.


युझवेंद्र चहल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेग स्पिनर युझवेंद्र चहल हा भारताचा यशस्वी T20 गोलंदाज मानला जातो. तरीही त्याला T20 वर्ल्डकपमध्ये 2022 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 69 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 85 विकेट्स घेणाऱ्या चहलला टीममध्ये न घेणं ही रोहित शर्माची सर्वात मोठी चूक ठरली.


पृथ्वी शॉ 


देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारा पृथ्वी शॉचा वर्ल्डकपच्या टीममध्ये समावेश केला जाऊ शकत होता. पृथ्वी शॉ पॉवरप्लेमध्ये अतिशय वेगवान रन्स काढतो. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांची पॉवरप्लेमधील कामगिरी टीम इंडियाच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. तर दुसरीकडे IPL मध्ये पृथ्वी शॉचा स्ट्राईक रेट 147.45 होता.


उमरान मलिक


150kph वेगाने गोलंदाजी करणारा उमरान मलिक वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला गेला असता तर त्याच्या गोलंदाजीचा सामन्याच्या निकालावर मोठा आणि चांगला परिणाम होऊ शकला असता. टीममध्ये भारतासाठी वेगवान गोलंदाजी करू शकेल असा एकही गोलंदाज नव्हता. उमरान मलिक यावेळी ट्रम्प कार्ड ठरला असता.