`वर्ल्ड कप`नंतर 19 वर्षांहूनही कमी वयात `हे` खेळाडू बनणार कोट्यधीश!
एकीकडे भारतीय युवा टीमची चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलकडे जाणार आहे, तर दुसरीकडे या युवा खेळाडूंना करोडपती बनण्याची संधी आहे.
मुंबई : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये मोहीम टीम इंडिया उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलीये. बुधवारी अंडर-19 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. एकीकडे भारतीय युवा टीमची चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलकडे जाणार आहे, तर दुसरीकडे या युवा खेळाडूंना करोडपती बनण्याची संधी आहे.
आयपीएल 2022 साठी एक मेगा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. मात्र त्याचसोबत फ्रँचायझींच्या नजरा या लिलावात युवा खेळाडूंवर असणार आहेत. त्यामुळे या युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
1.यश धुल
बीसीसीआयने मंगळवारी 590 खेळाडूंची यादी जाहीर केलीये. लिलावाच्या या यादीत अंडर-19 वर्ल्डकप खेळणाऱ्या 5 खेळाडूंचा समावेश आहे. या यादीत कर्णधार यश धुलचाही समावेश आहे. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यश धुलने आतापर्यंत केवळ 2 सामने खेळले असून त्याने 102 धावा केल्यात.
2. हरनूर सिंह
या लिलावात ओपनर हरनूर सिंगवर सर्व टीमच्या नजरा असणार आहेत. हरनूर सिंगने अंडर 19 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत केवळ 104 रन्स केले आहेत. मात्र सराव सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावलं होतं. तेव्हापासून सर्वांच्या नजरा हरनूर सिंगवर आहेत.
3. राजवर्धन हंगरगेकर
वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरही यावेळी लिलावात सामील होणार आहे. राजवर्धन हंगरगेकरने या वर्ल्डकपमध्ये अप्रतिम गोलंदाजी केलीये. त्याने 16 च्या सरासरीने 5 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 216 च्या स्ट्राईक रेटने रन्सही केलेत. त्यांची बेस प्राईज 30 लाख रुपये आहे.
4. विक्की ओस्तवाल
स्पिनर्समध्ये डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवालचा लिलावात समावेश करण्यात आला आहे. त्याने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 10 च्या सरासरीने 9 विकेट्स घेतल्या आहेत.