मुंबई : सध्या आयपीएल सुरू आहे. या लीगमध्ये अनेक बॉलर्स नो बॉल टाकताना दिसत आहेत. मात्र असेही काही बॉलर्स होऊन गेले ज्यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये एकदाही नो बॉल टाकला नाही. या लिस्टमध्ये भारतीय खेळाडूच्या नावाचाही समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लिस्टमध्ये पहिलं नाव इम्रान खान यांचं आहे. पाकिस्तानचा यशस्वी कर्णधार म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकही नो बॉल टाकला नाही. 


इम्रान खान 1982 मध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमचं कर्णधारपद सांभाळलं. 1992 मध्ये पाकिस्तानने इम्रानच्या नेतृत्वाखाली एकमेव आणि पहिला वन डे वर्ल्ड कप जिंकला. त्याने पाकिस्तानसाठी 88 कसोटी सामन्यात 3807 धावा केल्या आणि 362 विकेट घेतल्या.


दुसरं नाव इंग्लंडचा ऑलराउंडर खेळाडू इयान बॉथमचं आहे. त्याने आपल्या 16 वर्षांच्या करिअरमध्ये एकदाही नो बॉल टाकला नाही. 102 कसोटी सामन्यात त्याने 383 विकेट्स घेतल्या. तर 5200 धावा केल्या. 116 वन डे सामन्यात 145 विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या आहेत. 


या लिस्टमध्ये डेनिस लिलीचं नावही आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये 70 कसोटी सामने खेळले असून 355 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी 63 वन डे खेळून त्याने 103 विकेट्स घेतल्या आहेत. 


वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू लान्स गिब्सनेही आपल्या कारकिर्दीत एकही नो बॉल टाकला नाही. या ऑफस्पिनरने वेस्ट इंडिजसाठी 79 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळले. ज्यात त्याने एकूण 311 विकेट घेतल्या. एकही नो बॉल न टाकणारा तो जगातील एकमेव फिरकी गोलंदाज आहे.


1983 मध्ये भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कपिल देव यांनीही आपल्या करिअरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. कपिल यांनी भारतासाठी 131 कसोटी आणि 225 एकदिवसीय सामने खेळले.