मुंबई : अनेक क्रिकेटर्स त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींमुळे फार चर्चेत असतात. अनेक मोठे खेळाडी असे आहेत की, मैदानावरील खेळ्याने सर्वठिकाणी त्यांच्या चर्चा होत असतात तर काही खेळाडू नियम तोडल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशाच काही खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात जेलची हवाही खाल्ली आहे.


रुबेल हुसैन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांग्लादेशाचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसैन यांच्यावर 2015 च्या वर्ल्डकपपूर्वी एक महिलेचा बलात्कार आणि लग्नाचं वचन देऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात केस फाईल केली. त्यावेळी त्याला वर्ल्डकपच्या टीममधून बाहेर करण्याचीही मागणी करण्यात आली होती. मात्र बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने त्याला वर्ल्डकप खेळण्याची परवानगी दिली होती.


मोहम्मद शमी


टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवरही त्याची पत्नी हसीन जहांने गंभीर आरोप लावले होते. ज्यामध्ये हुंडा, मॅच फिक्सिंग आणि शारीरिक छळ असे आरोप केले गेले होते. यावर बीसीसीआयने त्याला क्लिन चीट दिली असली तरी पोलिसांनी त्याच्याविरोधात केस ठोकली. ही केस अजूनही सुरु आहे.


ल्यूक पोमर्शबॅक


ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पोमर्शबॅकवर एका अमेरिकेतील महिलेने छेडछाड आणि मारहाणीचा आरोप केला होता. आयपीएल 2012 सुरु असताना हा आरोप लावण्यात आला असल्याने त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्याला अटकंही केली होती. त्यावेळी तो पूर्ण सिरीज खेळू शकला नव्हता. दरम्यान हे प्रकरण कोर्टाच्या बाहेर सोडवलं गेल्याची माहिती आहे


बेन स्टोक्स


इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सवरही गंभीर आरोप लावण्यात आले होते. 2017 मध्ये ब्रिस्टलच्या एका नाईटक्लबच्या बाहेर त्याची एका व्यक्तीसोबत वाद झाली होती. दोघांमध्ये मारामारी झाली असून त्या व्यक्तीच्या डोळयाजवळील हाड फ्रॅक्चर झालं होतं. ज्यानंतर स्टोक्सविरोधात पोलिसांत रिपोर्ट करण्यात आली.


एस श्रीसंत


आयपीएलच्या 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप एस श्रीशांतवर लावण्यात आला होता. यावेळी त्याला दिल्ली पोलिसांनी अटकंही केली होती. त्यावेळी काही दिवसांनंतरच त्याला जामीन देण्यात आला होता. तेव्हा आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी आणण्यात आली होती. मात्र ही बंदी हटवून 7 वर्षांची बंद करण्यात आली होती.