दिल्ली : पाकिस्तान हा मुस्लिम बहुसंख्य देश आहे आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघात बहुतांश मुस्लिम खेळाडूंचा समावेश आहे. अनेकदा टीममध्ये हिंदू खेळाडूंशी भेदभाव केला जात असल्याचंही समोर आलंय. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे दानिश कनेरिया. दानिश कनेरियाला पाकिस्तान क्रिकेट संघात हिंदू असल्याने वाईट वागणूक मिळाली. याचा खुलासा खुद्द दानिश कनेरियाने केला होता. दानिश कनेरियासह 7 बिगर मुस्लिम खेळाडू पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून खेळले आहेत. 


दानिश कनेरिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दानिश कनेरिया हा पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून खेळणारा शेवटचा मुस्लिम नसलेला खेळाडू होता. कनेरियाने 2000 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. कनेरियाने पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामने खेळले. नंतर फिक्सिंगमध्ये नाव आल्याने कनेरियाला पाकिस्तान संघातून वगळण्यात आलं होतं. 


युसूफ योहाना



सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या युसूफ योहानाने पाकिस्तानी संघासाठी 90 कसोटी सामने खेळले आहेत. युसूफने 1998 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघात गैर-मुस्लिम खेळाडू म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. युसूफ योहाना हा ख्रिश्चन धर्माचा होता, परंतु 2004 मध्ये त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव मोहम्मद युसूफ ठेवलं.


अनिल दलपत सोनवारिया



पाकिस्तानकडून खेळलेला माजी यष्टीरक्षक अनिल दलपत सोनवारिया हा दानिश कनेरियाचा चुलत भाऊ आहे. अनिल दलपत पाकिस्तान क्रिकेट संघातील पहिला हिंदू खेळाडू म्हणून खेळला. अनिल दलपत याने 1984 मध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अनिल दलपत पाकिस्तान संघात फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत आणि केवळ 9 कसोटी सामने खेळू शकले. अनिल दलपतने आपल्या कारकिर्दीत या सामन्यांमध्ये 167 धावा केल्या.


एंटाओ डिसूजा



ख्रिश्चन धर्मातील एंटाओ डिसूजा यांनी 1959 मध्ये पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. परंतु त्यांना त्यांचं करियर पुढे करता आलं नाही आणि ते फक्त 6 कसोटी सामने खेळू शकले. त्याचा जन्म गोव्यात झाला, परंतु ते पाकिस्तान आणि कराचीकडून क्रिकेट खेळले. त्यांचे वडील 1947 च्या फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले होते. 


डंकन शार्प



ख्रिश्चन असलेले डंकन शार्प यांनी 1959 मध्ये पाकिस्तानकडून खेळण्यास सुरुवात केली. डंकन शार्प आपली कारकीर्द लांबवू शकला नाही आणि केवळ दोन कसोटी सामने खेळू शकला. अँग्लो-पाकिस्तानी डंकन अल्बर्ट शार्पने पाकिस्तानसाठी फक्त तीन कसोटी सामने खेळले आणि 22.33च्या सरासरीने 134 धावा केल्या.


वॉलिस मॅथिएज



ख्रिश्चन वॉलिस मॅथियास यांनी 1974 मध्ये पाकिस्तानकडून करिअरला सुरुवात केली. मॅथियासने पाकिस्तानसाठी 21 कसोटी सामने खेळले ज्यात त्याने 783 धावा केल्या. 


सोहेल फजल



क्रिस्टियन सोहेल फझलने पाकिस्तानकडून दोन एकदिवसीय सामने खेळले. 1989-90 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात, सोहेल फझलने तीन उंच षटकार मारून संघाची धावसंख्या 250 च्या पुढे नेली. हा सामना पाकिस्तानने 38 धावांनी जिंकला. या सामन्यात त्याला जावेद मियांदादसमोर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं.