T20 World cup : कालचा दिवस संपूर्ण क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट दिवस होता. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये (Semifinal) इंग्लंडच्या टीमने भारताचा (Team India) दारूण पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडिया आता वर्ल्डकपच्या (T20 World cup) बाहेर पडलीये. त्यामुळे आता टीम इंडियातील खेळाडूंना आता पुढील सिरीजवर लक्ष द्यायचं आहे. टीम इंडिया आता पुढील दौरा न्यूझीलंडविरूद्ध आहे. त्यामुळे काही आता काही खेळाडू थेट न्यूझीलंडला (new zealand) जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

T20 वर्ल्डकप गमावल्यानंतर भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, विक दिनेश कार्तिक, स्पिनर आर अश्विन, अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मायदेशी म्हणजेच भारतात परतणार आहेत. 


दिनेश कार्तिक आणि आर अश्विन या दोघांची आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड करण्यात येणार आहे. टीम इंडियाचा संपूर्ण कोचिंग स्टाफही बदलण्यात येणार आहे. याचं कारण म्हणजे त्यांना विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे आता व्हीव्हीएस लक्ष्मण अँड कंपनी न्यूझीलंडला जाणार आहे.


टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची सिरीज खेळणार आहे.  T20 सिरीज 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सिरीजमधील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळवला जाईल. तर 3 सामन्यांची वनडे सिरीज 25 नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरू होणारे.


न्यूझीलंडविरूद्ध टी-20 सिरीजसाठी टीम इंडिया


हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (डब्ल्यूके), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्सी पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.