वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूबद्दल खास गोष्टी...
मणिपुरच्या मीराबाई चानूने गुरूवारी देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली.
नवी दिल्ली : मणिपुरच्या मीराबाई चानूने गुरूवारी देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. साधारणपणे २० वर्षांनंतर तिने वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पिंयनशीपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. यापुर्वी ऑल्मपिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने भारताला कांस्य पदक जिंकून दिले होते. हा पराक्रम देखील २२ वर्षांनी घडून आला होता.
रेकॉर्ड तोडला
मणिपुर येथील इंफाल ईस्ट येथे राहणाऱ्या मीराबाई चानू हिचे वजन ४८ किलो आहे. आणि तिने १९५ किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर तिने मल्लेश्वरीचा रेकॉर्ड देखील तोडला.
मीराबाईबद्दल...
मीराबाईचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ मध्ये झाला. ती मुळतः मणिपुरची आहे. २००७ मध्ये तिने खेळाला सुरूवात केली. याची सुरूवात तिने इंफालच्या खुमन लंपक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपासून केली. कुंजारानी देवी हे तिचे प्रेरणास्थान आहे.
तिचे पराक्रम...
मीराबाईने १९४ किलो वजन उचलले. यात तिने ८५ स्नेचमध्ये आणि १०९ क्लीन एंड जर्कमध्ये उचलले. हा पराक्रम करून तिने एक नॅशनल रेकॉर्ड रचला आहे. मीराने २०१६ मध्ये साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तर २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये ४८ किलो कॅटगरीत रौप्य पदक जिंकले होते.
२०११ मध्ये यूथ चॅम्पिंयनशीपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. गुवाहाटीत झालेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पिंयनशीपमध्ये बेस्ट लिफ्टरचा किताब पटकावला होता.
देशाला अभिमान
तिच्या या पराक्रमाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिला शुभेच्छा दिल्या.