नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या वनडे सीरिज सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला झटका बसलाय. १२ सप्टेंबरला या दौऱ्यातील पहिला सराव सामना होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच खेळणार नाहीये. पायाला दुखापत झाल्याने त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाहीये. त्यामुळे या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आलीये.


सहा आठवड्यांपूर्वीच फिंचला ही दुखापत झाली होती. तेव्हा तो इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत होता. फिंच अद्याप पूर्ण बरा झालेला नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाची मॅनेजमेंट टीम कोणाताही धोका पत्करणार नाही. १७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या वनडे सामन्यांआधी तो फिट होणार असल्याची आशा आहे.