मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल सातत्याने चांगला खेळत आहे. त्यामुळे तो चर्चेत आहे. २५ वर्षीय राहुलने १८ कसोटी सामन्यात २९ डाव्यात त्यांने ५६.०९च्या धावगतीने १२५७ धावा केल्यात. यात तो एकवेळा नाबाद राहिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या वेळी त्यांने  ८अर्धशतके आणि ४ शतके झळकविली आहेत. राहुल कसोटी सर्वाधिक धावा 199 आहे. त्यांने ६ सामन्यांमध्ये एक शतक आणि एक अर्धशतक ठोकत २२० धावा केल्या आहे. त्याला ८ वेळा टी-२० क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे.


के एल राहुलने तिन्ही स्वरूपात शतक झळकावलेय.   भारतीय संघात चांगली कामगिरी करणाऱ्या राहुलच्या वैयक्तिक जीवनात नवे नाव जोडले गेलेतय. त्याची गर्लफ्रेंड एक टीव्ही अॅंकर आहे. ती एका फुटबॉल क्बलच्या टीव्ही चॅनेलशी अॅंकर होती. तसेच ती एका फाईव्ह स्टार हॉटेलची मार्केटिंग एसोसिएट होती. आयपीएलच्यावेळी ती राहुलला शुभेच्छा देताना दिसलेय.


एलिक्जिर नाहर ही बंगळुरु येथे राहणारी आहे. तिने माऊंट कार्मल कॉलेजमधून जर्नालिझम, इकोनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्सची पदवी घेतली आहे. एलिक्जिर सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसते. इंस्टाग्रामवर तिची काही ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.



कर्नाटकच्या या खेळाडूने एका चॅनेलशी बोलताना बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीसोबत बोलताना ही खासबाद बोलून दाखवली, तो विराट कोहलीला आदर्शन मानतो.