मुंबई : भारतात क्रिकेट खूप लोकप्रिय मानलं जाते. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज टी नटराजन त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तर आता नटराजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी नटराजन त्याच्या खेळामुळे नाही तर अन्य काही कारणांमुळे चर्चेत आहेत. लोक त्यांच्या कामाचे खूप कौतुक करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाकडून खेळणाऱ्या टी नटराजनने गेल्या काही काळापासून टीममध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याचा करिअरचा आलेख झपाट्याने वाढताना दिसला. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नटराजन त्यांच्या गावात क्रिकेटचे मैदान बांधण्यात येतंय. या मैदानाला नटराजन क्रिकेट ग्राउंड असं नाव देण्यात येणार असल्याचं नटराजन यांनी सांगितलं.



टी नटराजनला जेव्हा-जेव्हा टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने ते पूर्णपणे सोडवले. नटराजनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. नटराजनने आयपीएल 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती, त्यानंतर त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. 


30 वर्षीय नटराजनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आणि लिहिलं की, मी माझ्या गावात सर्व सुविधांसह नवीन क्रिकेट मैदान बांधत असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. मी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतासाठी पदार्पण केलं होतं आणि यावर्षी डिसेंबरमध्ये क्रिकेटचे मैदान तयार होणार आहे.