Asia Cup 2023: एशिया कपचं ( Asia Cup 2023 ) चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालेलं दिसतंय. एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये भारत विरूद्ध श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी हा सामना रंगणार असून कोण एशिया कप ( Asia Cup 2023 ) जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष्य आहे. मात्र यावेळी चाहत्यांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. चाहते फायनलमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान ( India-Pakistan ) यांच्या सामन्याची वाट पाहत होते. मात्र तसं होऊ शकलं नाहीये. 


39 वर्षांनंतर देखील स्वप्न राहिलं अपूर्ण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एशिया कप 1984 पासून आयोजित केला जातोय. यंदाचा एशिया कपचा सिझन हा 16 वा असून आतापर्यंत 13 सिझनमध्ये सामने वनडे स्वरूपात खेळले गेले आहेत. मात्र आतापर्यंत अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान ( India-Pakistan ) हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले नाही.  भारत-पाकिस्तान टीम अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी यंदा दावेदार मानले जात होती. मात्रा गुरुवारी श्रीलंकेविरूद्ध झालेल्या पराभवाने पाकिस्तानचं फायनल गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे.


पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी टीम इंडिया


सध्या एशिया कपच्या पॉईंट्स टेबलचा विचार केला तर टीम इंडिया टॉपवर आहे. आतापर्यंत सुपर 4 मध्ये टीम इंडियाने 2 सामने खेळले असून दोन्हीमध्ये विजय मिळवणं शक्य झालं आहे. दरम्यान टीम इंडिया रनरेट देखील चांगलं आहे. सुपर 4 मध्ये टीम इंडियाने ( Team India ) पहिल्यांदा पाकिस्तानचा 228 रन्सने पराभव केला. त्यानंतर भारताने श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. तर 15 सप्टेंबर रोजी टीम इंडिया ( Team India ) बांगलादेशविरूद्ध सामना खेळणार आहे.


कसे आहेत एशिया कपमध्ये भारत पाकिस्तानचे आकडे?


एशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) वनडे फॉरमॅटमध्ये दोन्ही टीममध्ये 15 सामने झालेत. या सामन्यांमध्ये टीम इंडियाने ( Team India ) 8 सामने जिंकलेत. तर पाकिस्तानने 5 सामने जिंकल्याची नोंद आहे. अशात 2 सामन्यांचा निकाल जाहीर झालेला नाही. दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत 134 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानला 73 विजय मिळाले असून भारताने 56 सामने जिंकलेत.