Ruturaj Gaikwad : भारतातील तरूण खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड़ ( Ruturaj Gaikwad ) या मराठमोळ्या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं. यंदाच्या आयपीएलमध्ये ऋतुराजने उत्तम फलंदाजी केली. त्याच्या या अप्रतिम खेळीच्या जोरावर त्याने त्याचे अनेक चाहते निर्माण केले आहेत. याचीच प्रचिती सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या टी-20 लीगमध्ये दिसून आली. या सामन्यातील ऋतुराजच्या ( Ruturaj Gaikwad ) एका चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये हा चाहता ऋतुराजला भेटण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 जून रोजी पुणेरी बाप्पा ( Puneri Bappa ) आणि कोल्हापूर टस्कर्स ( Kolhapur Tuskers ) यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यामध्ये ऋुतराजच्या ( Ruturaj Gaikwad ) एका चाहत्याचं कृत्य व्हायरल होतंय. यामध्ये ऋतुराजच्या पाया पडण्यासाठी या चाहत्याने सुरक्षा रक्षकांना चकमा दिला आणि मैदानावर पोहोचला. दरम्यान त्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. 


कोल्हापूरविरूद्धच्या सामन्यात पुण्याच्या टीमने टॉस जिंकून कर्णधार ऋतुराज गायकवाड़ ( Ruturaj Gaikwad ) ने पहिल्याला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कोल्हापूरच्या टीमने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमावून 144 रन्स केले. 


ऋतुराजला भेटण्यासाठी तोडले सर्व नियम


यावेळी कोल्हापूरने दिलेलं आव्हान स्विकारण्यासाठी पुण्याची टीम मैदानावर आली होती. यावेळी ऋतुराजच्या ( Ruturaj Gaikwad ) एका चाहता धावतच मैदानावर आला. यावेळी सुरक्षा रक्षकांना बाजूला सारून तो फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडच्या पायाला स्पर्श करायला गेला. या चाहत्याने ऋतुराजच्या ( Ruturaj Gaikwad ) पायांना हात लावला आणि त्याच्या जागेवर परत गेला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ( Social Media Viral Video ) होतोय. 



कोल्हापूरविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने ( Ruturaj Gaikwad ) अर्धशतकी खेळी खेळून टीमला दणदणीत विजय मिळवून दिला. त्याने 27 बॉल्समध्ये 64 रन्स करत टीमला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. ऋतुराज गायकवाडने या खेळीत पाच फोर आणि पाच सिक्स लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 237.04 होता.