लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवताना दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताने या सामन्यात ८ विकेट राखून विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने टीममधील सर्वांचीच पाठ थोपटली. आतापर्यतची ही आमची सर्वोत्तम कामगिरी असल्याचे विराट म्हणाला. 


भारताने टॉस जिंकताना द. आफ्रिकेला पहिल्यांदा फलंदाजीसाठी बोलावले. भारताच्या तिखट माऱ्यासमोर आफ्रिकेचा डाव १९१ धावांवर संपुष्टात आला.   त्यानंतर भारताने हे सोपे आव्हान अवघ्या ३८ ओव्हरमध्ये पूर्ण केले. 


टॉस निर्णायक होता आणि आम्ही तो जिंकला. एकापाठोपाठ एक विकेट मिळत गेल्या. फिल्डर्सनीही बॉलर्सला चांगली साथ दिली, असे विराट म्हणाला. 


सेमीफायनलमध्ये भारताची लढत आता बांगलादेशशी होणार आहे. १४ जूनला पहिली सेमीफायनल होतेय तर १५ जूनला दुसरी सेमीफायनल रंगणार आहे.