First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे हिरो आहेत. सोशल मीडियावरही टिम इंडियाचे क्रेझ कमी होताना दिसत नाहीये. अशातच सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पहिल्या क्रिकेट टीममधील खेळाडूंच्या नावांचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. यात स्वतंत्र भारताच्या क्रिकेट टीममधील खेळाडूंची नावे आहेत. हे पाहून युजर्सदेखील मोठ्या उत्साहात हा फोटो शेअर करत आहेत. या यादीतील काही नावे वाचून तुम्हीची आश्चर्य व्यक्त कराल. ही लिस्ट ट्विटरवर मयुश घोष यांनी पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 76 वर्षांपूर्वी भारत जेव्हा स्वातंत्र्य झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता आणि त्याचवेळची ही लिस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या लिस्टमध्ये खेळाडूंची नावेदेखील स्पष्टपणे दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या नावापुढे त्यांनी सह्यादेखील केल्या आहेत. ही यादी खरी असल्याचा दावा केला जात आहे. 


ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या पोस्टमधील त्या कागदावर लिहलेल्यानुसार, 1947 -48 दरम्यान इंडियन क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया येथे गेली होती. मयुष घोष याने शेअर केलेल्या पोस्टनुसार, ही त्यांची आत्तापर्यंत सगळ्यात किंमती जमापूंजी आहे. 


सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेली लिस्ट पाहून क्रिकेटचे चाहतेही भावूक झाले आहेत. एका युजर्नने म्हटलं आहे की, ही लिस्ट एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीये. तर, काही युजर्सनी त्यातील खेळाडूंची नावं पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. यात उल्लेख असलेले आमिर इलाही आणि गुल मोहम्मद दोघेही भारत आणि पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले होते. तर, या लिस्टनुसार, टीम इंडियाचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ हे होते, तर, उपकर्णधार विजय हजारे हे होते. 



एका युजरने यातील नावं पाहून म्हटलं आहे की, बहुंताश खेळाडू हे बडोदा येथील आहेत. बडोद्यातील नागरिकांसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर, दोन खेळाडू हे मुंबईतील आहे. के. एम. रांगणेकर आणि डी. जी पहाडकर हे दोन खेळाडू मुंबईतील होते.