या कारणामुळे सेमीफायनलमध्ये नाही पोहोचू शकला बांगलादेशचा संघ
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशला हरवताना फायनल गाठली. आता फायनलमध्ये त्यांचा मुकाबला रविवारी पाकिस्तानशी होतोय. भारताविरुद्धच्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळेच पराभव पत्करावा लागल्याचे बांगलादेशचे खेळाडू सामना संपल्यानंतर म्हणाले.
लंडन : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशला हरवताना फायनल गाठली. आता फायनलमध्ये त्यांचा मुकाबला रविवारी पाकिस्तानशी होतोय. भारताविरुद्धच्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळेच पराभव पत्करावा लागल्याचे बांगलादेशचे खेळाडू सामना संपल्यानंतर म्हणाले.
बांगलादेशमधील वृत्तपत्रातील बातम्यांनुसार बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रेहमानचे अपयश पराभवासाठी कारणीभूत ठरले. सेमीफायनलच्या आधी रेहमानने आपण भारताविरुद्ध चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करु असे म्हटले होते.
मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. भारतीय फलंदाजांनी रेहमानच्या ६ षटकांत तब्बल ५३ धावा तडकावल्या. यात त्याला एकही विकेट काढता आली नाही. तो सर्वात फ्लॉप गोलंदाज ठरला.