मुंबई : उद्यापासून श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास आणि ऐतिहासिक असणार आहे. टीम इंडियाकडून विराट कोहली 100वा टेस्ट सामना खेळणार आहे. 100वा टेस्ट सामना खेळणारा तो 12 खेळाडू असणार आहे. यावेळी प्रत्येक खेळाडू विराटला शुभेच्छा देतोय. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीयो शेअर केला आहे. हा व्हिडीयो सचिन तेंडुलकरचा असून त्याच्या 100 व्या टेस्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याने विराट नाव पहिल्यांदा कधी ऐकलं होतं याबाबत सांगितलं आहे.


सचिन या व्हिडीयोमध्ये म्हणतो, 2007 मध्ये मी ऑस्ट्रेलियाच्य दौऱ्यावर असताना विराटचं नाव ऐकलं होतं. त्यावेळी तो मलेशियामध्ये अंडर 19 वर्ल्डकप खेळत होता. आमच्या टीममध्ये अनेकजण असे होते जे त्याचं कौतुक करत, विराटची बँटींग पाहण्याजोगी असल्याचं म्हणत होते. जेव्हाही तो माझ्यासोबत खेळला त्यावेळी तो त्याचा खेळामध्ये सुधारणा आणत होता. 


सचिनने सांगितला विराटसबद्दल मजेदार किस्सा


सचिन सांगतो, ज्यावेळी आम्ही 2011 मध्ये ऑस्ट्रेलियात होते तेव्हा कॅनबरातील एका हॉटेलमध्ये आम्ही जेवलो होतो. त्यावेळी मला खाणं थोडं जास्त झालं होतं. त्यावेळी विराट मला म्हणाला, अती झालं आता, फिटनेसवर लक्ष द्या. फिटनेससंदर्भात विराट माझा रोल मॉडेलच आहे.