नवी दिल्ली : अमेरिकेतील टेलिव्हिजन सिटकॉम सिरीज 'द बिग बँग थियोरी' मध्ये भारतीय क्रिकेट पट्टूंची थट्टा उडवण्यात आली आहे. यामध्ये आर अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या या तिघांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सिरीजच्या ११ व्या सिझनमध्ये स्टार कुनाल नय्यर जो भारतीय खगोलशास्त्रज्ञ राजेश कोठरपापलीची भूमिका साकारत आहे. त्याने आपला मित्र हॉवर्ड वोलोविट्ससोबत तीन भारतीय क्रिकेट पट्टूंची खिल्ली उडवली आहे. या व्हिडिओ नुसार अमेरिकेतील राज आपल्या विदेशी मित्रांना क्रिकेट मॅच बघायला घेऊन येतो. 


राजद्वारे तीन खेळाडूंचे नाव घेऊन हॉवर्ड मॅचच्या दरम्यान भारतीय गोलंदाज आर अश्विनची ओळख करून देताना तो सांगतो की, रविचंद्रन अश्विन हा अतिशय सुंदर आहे. तर हार्दिक पांड्याला बनवून म्हणतो की, भुवनेश्वरप्रमाणे दिसतो. तर हॉवर्ड एक अमेरिकन असल्यामुळे उत्तर देतो की, Wooah, Wooah, Wooah !!! 



यामध्ये क्रिकेटच्या संदर्भात कोणतीही चर्चा नाही. पण क्रिकेटरची मस्करी यासाठी उडवली गेली आहे कारण भारतीय लोकांची नावे ही भारी असतात. या व्हिडिओमध्ये अनेक लोकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये उडवलेली खिल्ली अनेकांना पसंद पडलेली नाही.