Team India : आजपासून आयसीसी वनडे वर्ल्डकपला ( ICC Men's Cricket World Cup ) सुरुवात होणार आहे. मात्र अशातच टीम इंडियाच्या एका खेळाडूबद्दल मोठी बातमी समोर येतेय. टीम इंडियाच्या एका खेळाडूचा घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियामधून बाहेर असलेला शिखर धवनच्या घटस्फोटला अखेर मंजून मिळाली आहे. बराच काळ विभक्त राहिलेले शिखर धवन ( Shikhar Dhawan ) आणि त्याची पत्नी आयशा आता कायदेशीरित्या वेगळे झाले आहेत. दिल्ली न्यायालयाने शिखर आणि आयशाचा घटस्फोट मंजूर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील कौटुंबिक न्यायालयाने शिखर धवनचा ( Shikhar Dhawan ) घटस्फोट मंजूर केलाय. मिळालेल्या रिपोर्टनुसार, कोर्टाने कबूल केलंय की, शिखरची पत्नी आयशा हिने क्रिकेटरला त्याच्या एकुलत्या एका मुलापासून अनेक वर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक त्रास दिला. घटस्फोटाच्या याचिकेत शिखरकडून पत्नीवर झालेले सर्व आरोप न्यायालयाने मान्य केले. धवनच्या पत्नीने एकतर या आरोपांना विरोध केला नाही किंवा स्वत:चा बचाव करण्यात अपयशी ठरल्याचं न्यायालयाने म्हटले आहे.


मुलाटी कस्टडी कोणाकडे जाणार?


37 वर्षीय शिखर धवनने ( Shikhar Dhawan ) त्याच्या याचिकेत म्हटलंय की, आयशाने आपल्याला मानसिक क्रूरतेची शिकार बनवले. न्यायालयाने धवनच्या मुलाच्या ताब्यात घेण्याबाबत सध्या कोणताही आदेश देण्यास नकार दिला. न्यायालयाने धवनला वाजवी कालावधीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या मुलाशी भेटण्याचा आणि व्हिडिओ कॉल करण्याचा अधिकार दिला आहे.


भारतात येणार मुलगा


मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक न्यायालयाने आयशाला शाळेच्या सुट्ट्यांचा अर्धा काळ मुलाला शिखर धवन ( Shikhar Dhawan ) आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याच्या उद्देशाने रात्रभर राहण्यासोबत भारतात आणण्याचे आदेश दिले. न्यायालयाने म्हटलंय की, याचिकाकर्ता शिखर धवन हा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. देशाचा नागरिक म्हणून आणि जबाबदार पिता म्हणूनही त्याला हक्क आहेत.


दोघांचा घटस्फोट होण्याचं कारण काय?


शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या लग्नाआधीच त्यांच्यात मतभेद असल्याचा दावा काही रिपोर्टमधून करण्यात आला.एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दोघांनी वेगळे होण्याबाबत चर्चा केली होती. यावेळी आयशाचे पहिले लग्न हे त्यांच्या घटस्फोटाचं कारण होतं. तिने आपल्या पहिल्या पतीला वचन दिलं होतं की, आपल्या मुलींची काळजी घेईल आणि ऑस्ट्रेलिया सोडणार नाही. 


दुसरीकडे तिने धवनला सांगितले की, ती त्याच्यासोबत राहणार आहे. लग्नानंतर ती मुलगा जोरावर आणि दोन्ही मुलींसोबत ऑस्ट्रेलियात राहात होती. यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाले. आयशाने न्यायालयाला सांगितलं की, तिला भारतात त्याच्यासोबत राहायचे आहे, परंतु पहिल्या लग्नापासून असलेल्या मुलींशी असलेली बांधिलकी आणि ऑस्ट्रेलियात राहिल्यामुळे ती भारतात राहण्यास येऊ शकली नाही.