Rohit Sharma: रोहितला विकत घेण्यासाठी `या` टीमचा मुंबई इंडियन्सशी संपर्क; कर्णधारपद गेल्यानंतर मोठा खुलासा
Rohit Sharma: मिडीयो रिपोर्टनुसार, रोहित शर्माबाबत ( Rohit sharma ) एक मोठी गोष्ट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन प्रिमीयर लीगमधील एका टीमने रोहितला खरेदी करण्याबाबत विचार केला होता.
Rohit Sharma: नुकतंच रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून बाजूला सारून हार्दिक पंड्याच्या हाती धुरा हाती देण्यात आली आहे. रोहित शर्मा गेल्या दशकापासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. मात्र हार्दिक पंड्याच्या कमबॅकमुळे कर्णधारपदावर पाणी सोडावं लागलं आहे. मात्र मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) हा निर्णय चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. अशात आता मिडीयो रिपोर्टनुसार, रोहित शर्माबाबत ( Rohit sharma ) एक मोठी गोष्ट समोर आली आहे.
ही टीम खरेदी करणार होती रोहितला
मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन प्रिमीयर लीगमधील एका टीमने रोहितला खरेदी करण्याबाबत विचार केला होता. रोहितला ( Rohit sharma ) विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सशी संपर्क साधला होता. मात्र हा करार पूर्ण झाला नाही. स्पोर्ट्स टुडेच्या बातमीनुसार, दिल्ली कॅपिटल्सने रोहित शर्मासाठी ( Rohit sharma ) मुंबई इंडियन्सशी संपर्क साधला होता.
रोहित शर्माने ( Rohit sharma ) दिल्ली कॅपिटल्सच्या टीमध्ये यावं आणि कर्णधारपद स्वीकारावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु हा करार होऊ शकला नाही. मात्र यानंतर दिल्लीने ऋषभला कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या अपघातानंतर ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.
मुंबई इंडियन्सने रोहितबाबत दिला नकार
स्पोर्ट्स टुडेच्या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, “स्मार्ट फ्रँचायझींपैकी एकाने रोहित शर्माला ( Rohit sharma ) साइन करण्याची संधी पाहिली आणि मुंबई इंडियन्सशी संपर्क साधला. परंतु यावेळी त्यांची विनंती मुंबईने नाकारली. त्या फ्रँचायझीचे नाव दिल्ली कॅपिटल्स आहे. दिल्ली कॅपिटल्स रोहित शर्माला ( Rohit sharma ) साइन करण्यासाठी तयार होती."
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन
जेव्हा मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) ट्रेडसाठी हार्दिकशी बोलणी केली, तेव्हा हार्दिकने मुंबई इंडियन्ससमोर एक अट ठेवली होती. मुंबई इंडियन्समध्ये ( Mumbai Indians ) येणार असेल तर कॅप्टन्सीची जबाबदारी पण द्यावी, असं हार्दिकने ( Hardik Pandya ) सांगितल्याचं एका रिपोर्टनुसार समोर आलंय. मुंबईने ( Mumbai Indians ) यासाठी वेळ घेतला अन् रोहितशी संपर्क साधला. दरम्यान यावेळी रोहितने हार्दिकच्या कॅप्टन्सीखाली खेळण्यास मंजुरी दिल्यानंतर हार्दिक नेतृत्व करणार असल्याची घोषणा करण्यात आली.