T20 World Cup 2024 | पुढल्या वर्षी अमेरिकेत होणार वर्ल्ड कपचा धुमधडाका; `या` तीन शहरावर लागली मोहर
ICC Men`s T20 World Cup 2024 : पुढल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये अमेरिकेत टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यासाठी आता आयसीसीने तीन शहरांच्या नावावर (USA venues) शिक्कामोर्तब केलंय.
USA venues locked for T20 World Cup : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा (T20 World Cup) थरार पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये रंगणार आहे. पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार जून महिन्यात रंगणार असून त्यासाठी 20 संघ पात्र ठरणार आहेत. प्रत्येकी 4 गटात हा वर्ल्ड कप खेळवला जाईल. एकूण 50 सामने पहायला मिळू शकतात. अशातच आता आयसीसीने (ICC) मोठी घोषणा केलीये, यामध्ये अमेरिकेतील तीन शहरांवर शिक्कामोर्तब केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून फ्लोरिडा, मॉरिसविले, डलॅस आणि न्यूयॉर्क या चार नावांची चर्चा होती. अशातच आता आयसीसीने तीन शहरांच्या नावावर मोहर उमटली आहे. यामध्ये डॅलस, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क या शहरांचा समावेश आहे. ग्रँड प्रेयरी आणि ब्रॉवर्ड काउंटीचा आकार मॉड्युलर स्टेडियम सोल्यूशन्सद्वारे वाढवला जाईल जेणेकरून आसन, मीडिया आणि प्रीमियम हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांचा विस्तार अंतिम कराराच्या अधीन असेल, असं आयसीसीकडून सांगण्यात आलंय.
आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी स्कॉटलँड आणि आयर्लंड पात्र ठरले आहेत. त्यामुळे आता 20 संघात होणारा लांबलचक वर्ल्ड कप आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. प्रत्येक गटातील 5-5 संघांपैकी प्रत्येकी 2-2 संघ टॉप 8 मध्ये प्रवेश करणार आहेत. टी 20 वर्ल्डकप 2024 ही स्पर्धा 4 ते 30 जून या दरम्यान खेळवली जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत 27 दिवसांत तब्बल 55 सामने खेळवले जाणार आहेत.
आणखी वाचा - ना रोहित ना विराट, 'हा' खेळाडू जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्ड कप!
दरम्यान, भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, वेस्टइंडीज , आयर्लंड, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, श्रीलंका, पीएनजी, यूएसए, नेदरलँड हे टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी पात्र ठरलेले संघ आहेत.