Tilak Varma: डेब्यू सामन्यात तिलक वर्माने रचला इतिहास; मिळवली राहुल द्रविडच्या क्लबमध्ये एन्ट्री!
Tilak Varma equalled rahul dravid record: टीम इंडियाला गेल्या 8 वर्षात आत्तापर्यंत क्रमांक 4 चा खेळाडू मिळाला नाही. त्यामुळे आता युवराजची जागा भरून काढणारा खेळाडू म्हणून तिलक वर्मा याचं नाव घेतलं जातंय. अशातच पहिल्याच सामन्यात तिलक वर्मा याने राहुल द्रविडच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे.
Tilak Varma Debut Record: भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI 1st T20 ) यांच्यात पहिला टी-ट्वेंटी सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने पहिला सामना 4 धावांनी जिंकला. पहिल्याच टी-ट्वेंटी सामन्यात तरुण खेळाडूंनी नाक कापलं. 150 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचे नाकीनऊ आल्याचं पहायला मिळतंय. भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर कॅरेबियन खेळाडूंना धाव धरला आला नाही. त्यानंतर भारताची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. मात्र, या सामन्यात नवा युवराज सिंह म्हणून नावारुपास येत असलेल्या तिलक वर्मा (Tilak Varma) याने पदार्पणाच्या सामन्यातच नवा विक्रम नावावर केला आहे.
भारत - वेस्ट इंडिज सामन्यात डेब्यु करणाऱ्या तिलक वर्माने सर्वांची मनं जिंकली. 2014 पासून म्हणजेच युवराज सिंह याच्यानंतर टीम इंडियाला गेल्या 8 वर्षात आत्तापर्यंत क्रमांक 4 चा खेळाडू मिळाला नाही. त्यामुळे आता युवराजची जागा भरून काढणारा खेळाडू म्हणून तिलक वर्मा याचं नाव घेतलं जातंय. अशातच पहिल्याच सामन्यात तिलक वर्मा याने राहुल द्रविडच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे. नेमकं काय झालं पाहुया...
पहिल्याच सामन्यात वर्माने आपल्या इनिंगची सुरूवात एक नाहीतर दोन सिक्स मारत केली. टीम इंडियाच्या दोन विकेट पडल्यानंतर तिलक वर्मा फलंदाजासाठी मैदानात उतरला. पहिल्याच सामन्यात दोन बॉलवर सलग दोन सिक्स मारत तिलक वर्माने आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात केली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश झाला. यासह त्याने टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सध्याचा संघ मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
आणखी वाचा - Kishore Kumar यांचं कोणतं गाणं सचिनला आवडतं? व्हिडीओ शेअर करत Sachin Tendulkar म्हणतो...
तिलक वर्माने 22 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 चौकार आणि 3 षटकार खेचले. 177 च्या स्टाईक रेटने वर्माने धावा चोपल्या. डेब्यु सामन्यात 170 पेक्षा अधिकच्या स्टाईक रेटने खेळ करणाऱ्या खेळाडूंमध्ये इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावांचा समावेश आहे.
डेब्यूनंतर तिलक वर्मा भावूक
देशासाठी खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. माझ्या कारकिर्दीत इतक्या लवकर मला भारताकडून खेळण्याची संधी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. भारतासाठी विश्वचषक जिंकणं हे लहानपणापासून माझं स्वप्न आहे. मी नेहमी विश्वचषक कसा जिंकायचा याचा विचार करतो. आता माझ्या खांद्यावर जर्सी आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतंय, असं म्हणत तिलक वर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं होतं.