Kishore Kumar यांचं कोणतं गाणं सचिनला आवडतं? व्हिडीओ शेअर करत Sachin Tendulkar म्हणतो...

Kishore Kumar Birth Anniversary: सचिन तेंडूलकरने किशोर कुमार  यांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त सचिनने (Sachin Tendulkar) एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

Updated: Aug 4, 2023, 04:02 PM IST
Kishore Kumar यांचं कोणतं गाणं सचिनला आवडतं? व्हिडीओ शेअर करत Sachin Tendulkar म्हणतो... title=
Kishore Kumar,Sachin Tendulkar,

Sachin Tendulkar Video On Kishore Kumar Birth Anniversary: क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर टीम इंडियाचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव असल्याचं दिसतो. सचिन जास्तीत जास्त वेळ कुटुंबासमवेत घालवताना दिसतोय. तर अनेक व्हिडिओ, फोटो आणि क्रिकेटच्या आठवणी तो शेअर करताना दिसतोय. अशातच सचिनचा त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सचिनने किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त (Kishore Kumar Birth Anniversary) सचिनने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

महान गायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त सचिनने एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये त्यांनी त्यांचं फेवरेट गाणं कोणतं? यावर प्रकाश टाकला. सध्या सचिनचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये सचिनने त्याच्या फॅन्सला एक आवाहन केलं आहे.

नेमकं काय म्हणाला सचिन?

आज किशोर दा यांची जयंती... त्यांच्या जयंतीनिमित्त मी असं गाणं वाजवणार आहे. ज्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. याचे खूप दमदार बोल आहेत. मी आता वाजवणार आहे, पण त्याआधी तुम्ही किशोर दा यांचे आवडते गाणे देखील शेअर करा, असं आवाहन सचिनने केलं आहे.  त्यावेळी सचिनने 'आने वाला पल जाने वाला है...', या गाणं वाजवलं.

पाहा Video

दरम्यान, 4 ऑगस्ट 1929 रोजी किशोर कुमार यांचा जन्म 'आभास कुमार गांगुली' म्हणून प्रसिद्ध बॅरिस्टर कुंजबिहारी लाल गांगुली यांच्या घरी मध्य प्रदेशातील खंडवा या छोट्याशा गावात झाला होता. मुंबईत आल्यानंतर सुरू झाला चित्रपटसृष्टीचा प्रवास... किशोर कुमार यांनी हिंदी तसेच बंगाली, मराठी, आसामी, गुजराती आणि कन्नडसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ज्यांची सर्वांचं हदय जिंकलं, त्याच किशोर कुमार यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या संगीतात एक वेगळाच सुगंध मिसळलाय, ज्याचा धमक आजही लोकांच्या हृदयावर दिसून येते. त्याचा संगीत सुगंध येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठीही दूर करणं अशक्य आहे.