VIDEO: रन आऊट झाल्यानंतर Tilak Varma कडून कोणाला शिवीगाळ? व्हिडीयो व्हायरल
तिलक वर्माच्या एका कृत्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येतंय.
मुंबई : काल मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगला होता. हातातोंडाशी आलेला हा सामना मुंबईने 12 रन्सने गमावला. पंजबाने मुंबईला 199 रन्सचं बलाढ्य लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या तिलक वर्माने चांगली खेळी केली. मात्र त्याच्या एका कृत्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येतंय.
Tilak Varmaची तूफान फटकेबाजी
मुंबईसाठी यंदाचा सिझन काही खास राहिलेला नाही. मात्र या सिझनमध्ये तिलक वर्माने त्याच्या खेळीने चांगला प्रभाव पाडला आहे. कालच्या सामन्यातंही त्याने 20 बॉल्समध्ये 36 रन्सची खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 सिक्स मारलेत. 180 च्या स्ट्राईक रेटने त्याने खेळी केली आहे.
दरम्यान यावेळी तिलकच्या एका कृत्याने त्याच्यावर टीकाही झाली. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात ताळमेळ नसल्याने त्याची खेळी संपुष्टात आली. यानंतर तिलक वर्मा फारच संतापलेला दिसून आला. यावेळी तो इतका वैतागला होता की त्याने डग-आऊटमध्ये जाताना अपशब्द वापरल्याचंही कॅमेरात कैद झालंय.
व्हिडीयो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय मिळवला. पंजाबने मुंबईला विजयासाठी 199 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 186 रन्सचं करता आले. पंजाबच्या या विजयासह मुंबईचा हा या मोसमातील सलग पाचवा पराभव ठरला.