सिडनी : चौथा सामना ड्रॉ ठरल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीज २-१ ने जिंकली आणि ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये पहिली टेस्ट सिरीज जिंकली. चौथ्या सामन्यात भारत मजबूत स्थितीत होता. पण पावसामुळे अंपायर्सने सामना ड्रा करण्याचा निर्मण घेतला आणि भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. सिरीज जिंकल्यानंतर भारतीय टीमने जोरदार सेलिब्रेशन केलं. जगभरातून भारतीय टीमचं कौतुक झालं.


भारतीय टीमचं कौतुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने पराभव स्विकारत भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या. टिमने म्हटलं की, 'भारतीय टीमला आमचा सलाम. आम्हाला माहित आहे की, भारतात जाणं आणि दुसऱ्या देशात खेळणं किती अवघड असतं. विराट आणि रवी शास्त्रींना शुभेच्छा. दुसऱ्या देशात जाऊन सिरीज जिंकणं कठीण असतं. मागील २ सामन्यांबाबत कोणतीच शंका नव्हती. पण आमच्याकडे एडिलेड टेस्ट जिंकण्याची संधी होती. पण भारताने आम्हाला त्या टेस्टमध्ये पराभवाचा धक्का दिला. पर्थमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली. पण शेवटच्या २ सामन्य़ांमध्ये आम्ही फेल ठरलो.'


जगातील सर्वात श्रेष्ठ पेस अटॅक टीम


भारतीय टीमचं कौतुक करताना टिमने म्हटलं की, 'ते सिरीज जिंकण्याचे हक्कदार होते. नेहमी सकारात्मक असलं पाहिजे. मला माहित आहे की आम्ही उदास आहोत. पण टीममध्ये प्रतिभा आहे. आमच्याकडे टॅलेंटेड खेळाडू आहेत पण ते सध्या खेळू शकत नाहीत. आमची टीम जगातील सर्वात श्रेष्ठ पेस अटॅकच्या विरोधात खेळत होती.' पेनने अशी आशा वर्तवली आहे की त्याची टीम यापासून काही तरी शिकेल. क्रिकेटमध्ये रन करणं सर्वात महत्त्वाचं असतं. आमच्या टीममध्ये असे खेळाडू आहेत जे समोरच्या टीमवर प्रेशर आणू शकतात.'


संबंधित बातमी: वनडे सिरीजमधून बुमराह बाहेर, २ नव्या खेळाडूंना संधी


पेन पुढे म्हणतो की, 'आम्ही कोणत्याही भ्रमात नाही आहोत. क्रिकेट एक शानदार खेळ आहे. आम्हाला माहित आहे की तो कोणत्याही क्षण उलटू शकतो.' पेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला फक्त एक सामना जिंकता आला. पेन सध्या मानसिक दबावात असल्याचं बोललं जात आहे.


संबधित बातमी : ऐतिहासिक विजयानंतर भारतीय टीमचं डान्स करत सेलिब्रेशन