IPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर
IPL 2023 Schedule : 23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या (IPL 2023) या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. या लिलावाची सर्वकाही अपडेट इथे जाणून घ्या...
IPL 2023 auction date : पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमी लिलाव कार्यक्रमाची (TATA Indian Premier League Mini Auction) आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये 273 भारतीय आणि 132 परदेशी आहेत आणि 10 फ्रँचायझींसह एकूण 87 जागा रिक्त आहेत.
तसेच 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आहेत तर 132 परदेशी खेळाडू देखील आहेत. यातील अनेक खेळाडूंना भरघोस रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. आयपीएलमध्ये (IPL 2023) अनेक खेळाडूंनी आपले चांगले करिअर घडवले आहे. यावेळी लिलावात सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक 42.25 कोटी रुपये आहेत. या लिलावात अफगाणिस्तानचा अल्लाह मोहम्मद गझनफर हा सर्वात तरूण खेळाडू असणार आहे. त्यामुळे संघ समिती तरुण खेळाडूंना संधी देणार की नाही?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा - IPL 2023 Auction Live: IPL ऑक्शनच काऊंटडाऊन सुरु, जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर
तसेच आयपीएल मिनी लिलावामुळे संघांना त्यांच्या संघात काही नवीन चेहरे जोडण्याची संधी मिळते. टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघातील अनेक स्टार खेळाडूंवर बाजी मारण्याची शक्यता आहे. यामध्ये हॅरी ब्रूकसारख्या युवा स्टार्सचा समावेश आहे. लिलावादरम्यान संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
संघ | शिल्लक रक्कम | खेळाडूंच्या रिक्त जागा |
सनरायजर्स हैदराबाद | 42.25 कोटी | 13 |
कोलकाता नाइट रायडर्स | 7.05 कोटी | 11 |
लखनऊ सुपर जायंट्स | 23.35 कोटी | 10 |
मुंबई इंडियन्स | 20.55 कोटी | 9 |
पंजाब किंग्ज | 32.02 कोटी | 9 |
राजस्थान रॉयल्स | 13.2 कोटी | 9 |
चेन्नई सुपर किंग्ज | 20.45 कोटी | 7 |
गुजरात जायंट्स | 19.25 कोटी | 7 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु | 8.75 कोटी | 7 |
दिल्ली कॅपिटल्स | 19.45 कोटी | 5 |
IPL लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
16.25 कोटी - ख्रिस मॉरिस (राजस्थान रॉयल्स - 2021)
16 कोटी - युवराज सिंग (दिल्ली डेअरडेव्हिल्स - 2015)
15.25 कोटी - इशान किशन (मुंबई इंडियन्स - 2022)
15.5 कोटी - पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स - 2020)
15 कोटी - काइल जेमिसन (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 2021)
14.5 कोटी - बेन स्टोक्स (रायझिंग पुणे सुपरजायंट्स - 2017)
14.25 कोटी - ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 2021)
14 कोटी - युवराज सिंग (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 2014)
वाचा : 'ही' 5 नावं लक्षात ठेवा, यांच्यावर पडणार पैशांचा पाऊस?
लिलाव कुठे पाहू शकता?
स्टार स्पोर्ट्सवर IPL 2023 मिनी लिलाव थेट पाहू शकता. Viacom 18 च्या Voot अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. तसेच https://zeenews.india.com/marathi/ वरही सर्व अपडेट वाचू शकता.
लिलाव कुठे होणार?
IPL 2023 चा लिलाव कोची येथे होणार असून आज दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. त्यासाठी सर्व संघांनी आपली रणनीती तयार केली आहे.
405 खेळाडूंवर बोली लागणार
आयपीएल 2023 लिलावात 405 खेळाडूंवर बोली लागणार आहे. आयपीएल 2023 साठी लिलाव कोची, केरळ येथे होणार आहे. जिथे सर्व 10 फ्रँचायझींचे मालक आणि अधिकारी त्यांच्या आवडत्या खेळाडूंवर बोली लावतील. प्रत्येकजण आयपीएलचा उत्कृष्ट संघ तयार करण्याचा प्रयत्न करतील.