मुंबई : सध्या सर्वत्र टोकियो ऑलिम्पिकची चर्चा सुरू आहे. प्रत्येक देशाचं लक्ष त्याकडे लागून आहे, कारण प्रत्येकाची इच्छा आहे की, आपल्या देशातील खेळाडूंनी विविध खेळांमध्ये मेडल घेऊन यावं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करावं. ऑलिम्पिक 2020 मध्ये, जिथे दररोज खेळात आपल्याला अनेक चढ -उतार पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर लोकांना प्रत्येक खेळाडूंबद्दल जाणून घेण्याची आणि त्यांचं आयुष्य कसं आहे हे पाहाण्याची इच्छा असते. त्यामुळे लोकं खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक रहस्येही बाहेर येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच पोलंडच्या एका महिला खेळाडूने पदक जिंकल्यानंतर ती लेस्बियन असल्याचे जाहीर केले. ज्यामुळे ती आता लोकांच्या चर्चेचा भाग बनली आहे.


पोलंडची खेळाडू कॅटरझिना झिलमन (Katarzyna Zillmann) एक ऑलिम्पिक रोव्हर आहे. तिने तिच्या संघासह, रौप्य पदक जिंकले आणि नंतर माध्यमांशी बोलताना तिने आपल्या गर्लफ्रेंडने खेळ्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल तिचे आभार मानले आणि सांगितले की ती लेस्बिन (lesbian) म्हणजे समलिंगी आहे.



झिलमन असेही म्हणाली की, ती यापूर्वी देखील काही मुलाखतींमध्ये तिच्या लैंगिक प्रवृत्तीबद्दल बोलली आहे, परंतु सार्वजनीकरित्या यावर क्वचितच चर्चा झाली आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिक खेळांसारख्या व्यासपीठावर तिने हे वक्तव्य केल्यानंतर, झिलमन आता प्रकाशझोतात आली आहे. झिलमन म्हणाली की,  ती LGBTQ समुदायातील लोकांना समर्थन देते.


झिलमनने या मुलाखतीत सांगितले की, मला वाटते की, मी यात अनेक लोकांना मदत करू शकते. मी 'स्पोर्ट्स अगेन्स्ट होमोफोबिया' टी-शर्टसह एक फोटो पोस्ट केले आणि पब्लिक फिगर असल्यामुळे, मी या टी-शर्टद्वारे हजारो आणि लाखो लोकांपर्यंत माझा संदेश पोहचवू शकले.


ते पुढे म्हणाले की मला अनेक तरुण मुलींकडून संदेश आले आहेत. रोइंग खेळांना आपले करिअर बनवू इच्छित असलेल्या एका तरुणीने माझ्याशी तिच्या घरातील कठीण परिस्थितीबद्दल सांगितले आणि तिने असेही सांगितले की, माझ्या वृत्तीमुळे तिला खूप प्रेरणा मिळाली आहे.



हजारो ट्रोल आणि द्वेषपूर्ण कमेंट्सकडे दुर्लक्ष करण्यासाठी असाच एक संदेश पुरेसा आहे.


विशेष म्हणजे, झिलमन पोलंडची आहे. अलीकडच्या काळात या देशात LGBTQ समुदायावर लोकांकडून खूप कमेंट्य आणि हल्ले करण्यात आले. परंतु त्यापैकी अनेक सरकारचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत झिलमनसाठी तिच्या लैंगिक प्रवृत्तीबद्दल बोलणे अधिक आव्हानात्मक होते.