मुंबई :  टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020) भारताचा 7 ऑगस्ट हा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी भारताने एकूण 2 पदकांसह एकूण 7 मेडल्सची कमाई केली. आधी बजरंग पुनियाने (Bajrang Puniya) कुस्तीत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. तर यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) गोल्डन थ्रो करत भारताला अॅथेलिटिक्स आणि टोकियो ऑलिम्पिकमधील पहिलंवहिलं पदक ते ही गोल्डन मिळवून (Golden Medel) दिलं. नीरजने भारताचा शेवट गोड आणि गोल्डन केला. भारताला ऑलिम्पिमध्ये 13 वर्षांनी दुसरं सुवर्ण पदक मिळालं. नीरजने ऐतिहासिक कमागिरी केली. त्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान आता गोल्ड नंतर नीरजचं पुढील लक्ष्य काय आहे, याबाबत त्याने खुलासा केला आहे. (Tokyo Olympics 2020 golden medel winner indian javelin thrower Neeraj Chopra's has set his next goal)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीरजचं टार्गेट काय?  
 
जे भल्या भल्या दिग्गजांना जमलं नाही, ते नीरजने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत केलं. मात्र नीरज या गोल्डन यशानंतर हुरळून गेला नाही. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा मानस नीरजचा आहे. नीरजचा ऑलिम्पिकमध्ये विक्रमी अंतराचा भाला फेकायचा आहे. नीरजसमोर आता 90 मीटर लांब विक्रमी थ्रो करण्याचं लक्ष्य आहे. 


ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 90.57  मीटर लांब भाला फेकण्यात आला आहे. नीरज काल झालेल्या सामन्यातच हा विक्रम मोडित काढण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्यापासून नीरज काही मीटर लांब राहिला. त्यामुळे आता नीरज हा रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या दृष्टीने लवकरच सराव करणार आहे.


नीरज काय म्हणाला?  


भाला फेक ही एक तांत्रिक स्पर्धा आहे. या स्पर्धेतील कामगिरी ही तुमच्या सरावावर अवलंबून असते. त्यामुळे माझे पुढील लक्ष्य हे 90 मीटरचे अंतर पार करणं असणार आहे. मी यावर्षी फक्त ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केलं होतं. आता मी सुवर्णपदक जिंकलोय. भविष्यातील स्पर्धांसाठी योजना तयार करणार आहे. भारतात परतल्यानंतर, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मी परदेशातून व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करेन" असं नीरज म्हणाला.